अनिल देशमुखांची वाढणार अडचण ? मुलगी, सुनेवर आरोपपत्र दाखल

नागपूर ; पुढराही वृत्तसेवा छ -राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची चिन्हे आहेत. सुमारे दोन वर्षानंतर सीबीआयने अनिल देशमुख यांची मुलगी पूजा आणि सून राहत देशमुख यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.   राष्ट्रवादी पवार गटाची भक्कमपणे बाजू मांडणाऱ्या देशमुख यांना भाजपने वेळोवेळी राजकीयदृष्ट्या लक्ष्य केले आहे हे विशेष. त्यांनी मर्यादेत बोलावे … The post अनिल देशमुखांची वाढणार अडचण ? मुलगी, सुनेवर आरोपपत्र दाखल appeared first on पुढारी.

अनिल देशमुखांची वाढणार अडचण ? मुलगी, सुनेवर आरोपपत्र दाखल

नागपूर ; पुढराही वृत्तसेवा छ -राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची चिन्हे आहेत. सुमारे दोन वर्षानंतर सीबीआयने अनिल देशमुख यांची मुलगी पूजा आणि सून राहत देशमुख यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.   राष्ट्रवादी पवार गटाची भक्कमपणे बाजू मांडणाऱ्या देशमुख यांना भाजपने वेळोवेळी राजकीयदृष्ट्या लक्ष्य केले आहे हे विशेष. त्यांनी मर्यादेत बोलावे असेही वक्तव्य भाजपनेत्यांनी केले आहे.  आता अमेक दिवसानंतर देशमुख यांची मुलगी आणि सुनेवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. माध्यमांमध्ये अहवाल लिक केल्याच्या २०२१ मधील प्रकरणात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्यात पूजा यांच्यावर कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सीबीआयच्या माहितीनुसार, पूजा यांनी हा अहवाल मिळवण्यासाठी अनिल देशमुख यांचे वकील आनंद दिलीप डागांसोबत कट रचला होता. त्यासाठी सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांना अहवाल देण्यासाठी लाच देण्याची योजना आखली २९ ऑगस्ट २०२१ रोजी हा अहवाल माध्यमांमधून लीक झाला होता. मुंबईचे तत्कालीन आयुक्त परमवीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले होते. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले होते. त्यासंदर्भातील अहवाल पूजा हिने लिक केल्याचा आरोप आहे. त्या अहवालात अनिल देशमुख यांनी कोणताही गुन्हा केला नाही, असे म्हटले असल्याचा दावा करण्यात आला. या प्रकरणात सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी आणि अनिल देशमुख यांचे वकील डागा यांना अटकही झाली होती.
The post अनिल देशमुखांची वाढणार अडचण ? मुलगी, सुनेवर आरोपपत्र दाखल appeared first on पुढारी.

नागपूर ; पुढराही वृत्तसेवा छ -राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची चिन्हे आहेत. सुमारे दोन वर्षानंतर सीबीआयने अनिल देशमुख यांची मुलगी पूजा आणि सून राहत देशमुख यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.   राष्ट्रवादी पवार गटाची भक्कमपणे बाजू मांडणाऱ्या देशमुख यांना भाजपने वेळोवेळी राजकीयदृष्ट्या लक्ष्य केले आहे हे विशेष. त्यांनी मर्यादेत बोलावे …

The post अनिल देशमुखांची वाढणार अडचण ? मुलगी, सुनेवर आरोपपत्र दाखल appeared first on पुढारी.

Go to Source