Nagar : नाट्य संकुलाच्या बांधकामाची घंटा वाजली
नगर : पुढारी वृत्तसेवा : कोट्यवधींचा निधी मिळूनही दहा वर्षापासून रखडलेले अन् नगर शहराच्या वैभवात भर घालणार्या नाट्य संकुलाच्या इमारतीचे काम अखेर पुन्हा सुरू झाले. महापालिका तसेच आ. संग्राम जगताप यांनी पाठपुरावा केल्यानंतर हे काम सुरू झाले. अहमदनगर शहराला मोठी सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाची ऐतिहासिक परंपरा आहे. त्याचबरोबर नाट्य परंपरेचा मोठा वारसा आहे. आतापर्यंत नगरच्या नाट्य परंपरने चित्रपट क्षेत्रासाठी उत्तम अभिनेते दिले आहेत. आजही राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा शहरात होतात. हौसी नाट्य स्पर्धा आजपासून सुरू झाली. त्याला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विविध नाटकांचे प्रयोगही शहरात होतात. परंतु, नाट्यकलावंतांना हक्काचे नाट्यगृह नाही.
यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह, माऊली संकुल असे दोन नाट्यगृह आहेत. अनेकदा नाट्यप्रेमींना हक्काचे नाट्य संकुल उभारण्याच्या वल्गना झाल्या. परंतु, त्याला मूर्त स्वरूप प्राप्त होत नव्हते. दहा वर्षांपूर्वी त्याला मुहूर्त मिळाला. प्रोफेसर कॉलनी चौकातील नगररचना योजना चार अंतिम भूखंड 129 वर नाट्य संकुल उभारण्यास परवागनी मिळाली. सुरूवातीला या प्रकल्पाची 12.47 कोटी किंमत होती. तर, स्थापत्य कामाची किंमत 7 कोटी 22 लाख होती. सुरूवातीला 500 आसन क्षमतेचे नाट्य संकुल उभारण्यात येणार होते. मात्र, त्यानंतर जास्ती-जास्त आसन क्षमतेचे बनवावे, अशी मागणी झाल्याने 500 असणांची क्षमता वाढविण्यात आली. त्यामुळे आता एकूण 1000 हजार असन क्षमतेचे नाट्यगृह होणार आहे. महाराष्ट्र शासन 60 लाख, महापालिका फंड 3 कोटी 15 लाख व आमदार संग्राम जगताप यांच्या स्वनिधीतून जिल्हा नियोजन समितीद्वारे 5 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. असा 8 कोटी 75 लाखांचा निधी नाट्य संकुलासाठी मिळाला आहे.
दरम्यान, अद्यापपर्यंत 3 कोटी 21 लाख रुपये खर्च झाला आहे. सिमेंट, लोखंडाचे दर वाढल्याने ठेकेदाराने काम थांबविले होते. यापूर्वी नाट्य संकुलाचा पूर्ण सांगाडा उभारण्यात आला होता. आता पुढील काम ठेकेदाराने सुरू केले आहे. त्यामुळे लवकरच नगरकर नाट्यप्रेमींना हक्काचा नाट्य संकुल मिळणार आहे.
The post Nagar : नाट्य संकुलाच्या बांधकामाची घंटा वाजली appeared first on पुढारी.
नगर : पुढारी वृत्तसेवा : कोट्यवधींचा निधी मिळूनही दहा वर्षापासून रखडलेले अन् नगर शहराच्या वैभवात भर घालणार्या नाट्य संकुलाच्या इमारतीचे काम अखेर पुन्हा सुरू झाले. महापालिका तसेच आ. संग्राम जगताप यांनी पाठपुरावा केल्यानंतर हे काम सुरू झाले. अहमदनगर शहराला मोठी सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाची ऐतिहासिक परंपरा आहे. त्याचबरोबर नाट्य परंपरेचा मोठा वारसा आहे. आतापर्यंत …
The post Nagar : नाट्य संकुलाच्या बांधकामाची घंटा वाजली appeared first on पुढारी.