श्री काळाराम मंदिराजवळील दुमजली वाड्याला आग

पंचवटी : Bharat Live News Media वृत्तसेवा– श्री काळाराम मंदिर परिसरातील उत्तर दरवाजा जवळ असलेल्या एका जुन्या दुमजली वाड्याला शुक्रवारी (दि. 23) रात्री अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. मात्र वाड्यात तळमजल्याला असलेले वैदिक विवाह संस्थेच्या ऑफिस व संसार उपयोगी वस्तू पूर्णत: जळून खाक झाल्या. सदर घटनेची माहिती पंचवटी अग्निशमनदलास मिळताच अग्निशमनदलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तीन पाण्याच्या बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की काळाराम मंदिर उत्तर दरवाज्याजवळ गिरीश पुजारी यांचे वैदिक विवाह संस्थेचे कार्यालय व दुमजली जुना वाडा आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमाराला अचानकपणे शॉर्ट सर्किट होऊन कार्यालयातील कागदपत्रे व इतर वस्तूंनी पेट घेतला. वाडा जुना व लाकडी असल्याने बघता बघता वाड्याच्या दुसऱ्या मजल्याने देखील पेट घेतल्याने घरातील फ्रिज फॅन कपडे व इतर संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. दोन मजली वाड्याला आग लागल्याची माहिती गिरीश पुजारी यांनी अग्निशमन दलाला फोन करून कळविली घटनेची माहिती मिळताच आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी स्वतः घटना स्थळी जाऊन भेट दिली.
पंचवटी अग्निशमन दलाचे लिडिंग फायरमन संतोष मेहंद्रे, एम के सोनवणे, एम एच गायकवाड, आर सी मोरे, इसाक शेख आदिंसह जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
हेही वाचा :
Sharad Pawar : शरद पवारांनी रायगडावरून फुंकली ‘तुतारी’, चिन्हाचे अनावरण
Uniform Civil Code | आसाम सरकारचा मोठा निर्णय, मुस्लिम विवाह कायदा रद्द
शिक्षण विभागात खाबुगिरी बोकाळली; शिक्षक मान्यतांचे पोर्टल कागदावरच
Latest Marathi News श्री काळाराम मंदिराजवळील दुमजली वाड्याला आग Brought to You By : Bharat Live News Media.
