Crime News : अल्पवयीन मुलाचा खून; सराइताला बेड्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जुन्या भांडणाच्या कारणातून अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याचा धारदार हत्यारांनी निर्घृण खून केल्याची घटना भिवंडीत घडली होती. त्यातील फरार झालेला सराईत आरोपी पुण्यातील त्याल्या बंडगार्डन पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रामनाथ ऊर्फ पापा मेमीना (रा. ताडीवाला रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणात करण हनुमंत लष्कर, दिनेश मारुती मोरे, चंदन … The post Crime News : अल्पवयीन मुलाचा खून; सराइताला बेड्या appeared first on पुढारी.

Crime News : अल्पवयीन मुलाचा खून; सराइताला बेड्या

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : जुन्या भांडणाच्या कारणातून अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याचा धारदार हत्यारांनी निर्घृण खून केल्याची घटना भिवंडीत घडली होती. त्यातील फरार झालेला सराईत आरोपी पुण्यातील त्याल्या बंडगार्डन पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रामनाथ ऊर्फ पापा मेमीना (रा. ताडीवाला रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणात करण हनुमंत लष्कर, दिनेश मारुती मोरे, चंदन उपेंद्र प्रसाद गोड, कैलास खंडु धोत्रे, आकाश परशुराम जाधव, विशाल विठ्ठल साबळे यांच्यासह इतरांवर अपहरण करून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दि. 14 फेब्रुवारी रोजी अल्पवयीन मुलाचे व्हीएलव्हीआर हॉटेलच्या समोरून अपहरण करण्यात आले होते.
बंडगार्डन पोलिसांना गुन्ह्याच्या वेळचे व्हिडीओ चित्रीकरण व सीसीटीव्ही फुटेजचे स्क्रीन शॉट्स मिळाले होते. त्या आधारे गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना रामनाथ सोनवणे ऊर्फ पापा हा बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार यामध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. तसेच तो ताडीवाला रोडवरील शंकर मंदिराजवळील नदीकिनारी असल्याची माहिती अंमलदार ज्ञानेश्वर बडे आणि मनोज भोकरे यांना मिळाली. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गावडे आणि पथकाने त्याला ताब्यात घेतले. या वेळी त्याने भिवंडी येथील गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदिपान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा

Maharashtra politics | उद्धव ठाकरेंचा विषय आमच्यासाठी संपला : देवेंद्र फडणवीस
अमेरिकेतील खासगी कंपनीचे मून लँडर उतरले चंद्रावर!
‘पीएमओ’सह एअर इंडियावर चीनकडून पाळत

Latest Marathi News Crime News : अल्पवयीन मुलाचा खून; सराइताला बेड्या Brought to You By : Bharat Live News Media.