सासाराम ते रांची… आकाश दीपची बिकट वाट वहिवाट

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : 27 वर्षीय आकाश दीपचा प्रवास दुर्गापूरमधील स्टार टेनिस बॉल क्रिकेटर म्हणून सुरू झाला. यानंतर त्याने कोलकाता येथे विभागीय क्रिकेट खेळले आणि त्यानंतर 23 वर्षांखालील क्रिकेट खेळल्यानंतर त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही हात आजमावला. पण, सासाराम (बिहार) मध्ये क्रिकेट खेळणे अपराधापेक्षा कमी नव्हते. (Akash Deep)
बिहारमध्ये क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी कोणतेही व्यासपीठ नव्हते (त्यावेळी बिहारला बीसीसीआयने निलंबित केले होते) आणि विशेषत: सासाराममध्ये हा गुन्हा होता. असे अनेक पालक होते जे आपल्या मुलांना सांगत असत. आकाशपासून दूर राहा, तो अभ्यास करत नाही आणि त्याच्या सहवासात तू खराब होशील.
इतर पालकांप्रमाणे आकाश दीपचे पालकही काळजीत पडले होते. ते आकाशला सरकारी भरतीची तयारी करण्याचा सल्ला देत होते. आकाशने सांगितले की, माझे वडील म्हणायचे की, बिहार पोलिसांच्या कॉन्स्टेबल भरती परीक्षेला बसावे. माझे वडील परीक्षांचे फॉर्म भरायचे आणि मी पेपर कोरा ठेवून परतायचो.
पण अचानक काळाने खूप वाईट वळण घेतले. सहा महिन्यांच्या कालावधीत आकाश दीपने त्याचे वडील आणि मोठा भाऊ गमावला. आकाशच्या खांद्यावर त्याच्या भावाच्या दोन मुलींची जबाबदारीही आली. एका मित्राच्या मदतीने आकाशला पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथील क्लबसाठी टेनिस बॉल क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली.
सुरुवातीला तो क्लबसाठी लेदर बॉल क्रिकेट खेळायचा, पण त्यावेळी पैशांची कमतरता होती. त्यामुळे तो महिन्यातून तीन-चार दिवस जिल्हाभर टेनिस बॉल क्रिकेट खेळायचा आणि त्या बदल्यात त्याला दिवसाला हजार रुपये मिळायचे. यातून तो महिन्याला 20 हजार रुपये कमावायचा. यातून महिन्याचा खर्च भागवत असे.
हेही वाचा :
IND vs ENG 4th Test : खोलवर रुजलेल्या ‘रूट’ने इंग्लंडच्या आशांना पालवी
IND vs ENG 4th Test : रूटचा शतकी संघर्ष, इंग्लंड 7 बाद 302; आकाश दीपचे यशस्वी पदार्पण
Joe Root New Record : रूटचा अद्भुत विक्रम! ‘असा’ पराक्रम करणारा पहिला इंग्लंडचा फलंदाज ठरला
Latest Marathi News सासाराम ते रांची… आकाश दीपची बिकट वाट वहिवाट Brought to You By : Bharat Live News Media.
