मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री 2 मार्चला बारामती दौर्‍यावर

बारामती : पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे 2 मार्च रोजी बारामतीत येत आहेत. त्यांच्या हस्ते येथे विविध विकासकामांचे उद्घाटन होणार असून, नमो महारोजगार मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे. आचारसंहितेपूर्वी बारामतीतील विकासकामांचे उद्घाटन व्हावीत, असा अजित पवार यांचा आग्रह होता. यानिमित्त महायुती लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणसिंग बारामतीतून फुंकेल, … The post मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री 2 मार्चला बारामती दौर्‍यावर appeared first on पुढारी.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री 2 मार्चला बारामती दौर्‍यावर

बारामती : Bharat Live News Media वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे 2 मार्च रोजी बारामतीत येत आहेत. त्यांच्या हस्ते येथे विविध विकासकामांचे उद्घाटन होणार असून, नमो महारोजगार मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे. आचारसंहितेपूर्वी बारामतीतील विकासकामांचे उद्घाटन व्हावीत, असा अजित पवार यांचा आग्रह होता. यानिमित्त महायुती लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणसिंग बारामतीतून फुंकेल, अशी चिन्हे आहेत.
बारामती शहरातील अत्याधुनिक बसस्थानक, बर्‍हाणपूर येथील पोलिस उपमुख्यालय व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयानजीक उभारण्यात आलेल्या पोलिस वसाहतींचे उद्घाटन 2 मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या हस्ते होईल. त्यासाठी आता बारामतीतील प्रशासकीय यंत्रणा कमालीची गतिमान झाली आहे. बारामती शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त बसस्थानकाची उभारणी करण्यात आली आहे. 50 कोटी रुपये खर्चून हे बसस्थानक उभारण्यात आले आहे.
हेही वाचा

Kolhapur Accident : ट्रॉलीचा हूक तुटून दुचाकीला धडक; पिता-पुत्राचा मृत्यू
भारताने बुडवलेली पाकची ‘गाझी’ सापडली
नमो महारोजगार मेळाव्यात 20 हजार रिक्त पदांची नोंदणी

Latest Marathi News मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री 2 मार्चला बारामती दौर्‍यावर Brought to You By : Bharat Live News Media.