इचलकरंजी : दाम्पत्यावर कटरने खुनी हल्ला; घटस्फोटित पतीचे कृत्य

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : घटस्फोटीत पतीने पत्नीसह तिच्या पतीवर कटरने वार करून जीवघेणा हल्ला केला. स्नेहल राकेश लोखंडे (वय 28), राकेश राजू लोखंडे (वय 30, दोघे रा. पुजारी मळा) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर इंदिरा गांधी सामान्य इस्पितळात उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात घडली. हल्लेखोर प्रकाश अशोक बुचडे (वय 45) … The post इचलकरंजी : दाम्पत्यावर कटरने खुनी हल्ला; घटस्फोटित पतीचे कृत्य appeared first on पुढारी.

इचलकरंजी : दाम्पत्यावर कटरने खुनी हल्ला; घटस्फोटित पतीचे कृत्य

इचलकरंजी, Bharat Live News Media वृत्तसेवा : घटस्फोटीत पतीने पत्नीसह तिच्या पतीवर कटरने वार करून जीवघेणा हल्ला केला. स्नेहल राकेश लोखंडे (वय 28), राकेश राजू लोखंडे (वय 30, दोघे रा. पुजारी मळा) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर इंदिरा गांधी सामान्य इस्पितळात उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात घडली. हल्लेखोर प्रकाश अशोक बुचडे (वय 45) हा स्वतःहून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हजर झाला.
येथील कामगार चाळ परिसरात राहणार्‍या प्रकाश बुचडे व स्नेहल या दोघांचा दोन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. यानंतर स्नेहल यांनी राकेश लोखंडे याच्याशी विवाह केला. घटस्फोटानंतरही मुलांचा सांभाळ करण्यावरून स्नेहल व प्रकाश यांच्यामध्ये वारंवार वाद होत होता. यातूनच या तिघांमध्ये जोरदार वाद झाला. प्रकाश याला दोघांनी मारहाण केली. या रागातून प्रकाश याने कटरने राकेश व स्नेहलवर वार केले. नागरिकांनी दोघांना उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य इस्पितळात दाखल केले. राकेश याची प्रकृती गंभीर आहे. प्रकाश बुचडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल उदय पाटील करीत आहेत.
Latest Marathi News इचलकरंजी : दाम्पत्यावर कटरने खुनी हल्ला; घटस्फोटित पतीचे कृत्य Brought to You By : Bharat Live News Media.