सुरक्षित भ्रूणाला मूलच मानले जाईल

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : सुरक्षित ठेवण्यात आलेल्या भ्रूणाला मूलच मानले जाईल. भ्रूण कोणी नष्ट केल्यास आणि त्यामध्ये कोणी दोषी ठरल्यास त्याच्यावर खटला चालवला जाईल, असा निकाल अमेरिकेच्या अल्बमा राज्याच्या कोर्टाने दिला आहे. आता या निर्णयावर अमेरिकेत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (USA)
यामुळे हजारो वर्षांपूर्वीच्या काळात परतल्यासारखे काही लोकांना वाटते, तर कोर्टाच्या निर्णयामुळे भ्रूण हत्येसारखे गुन्हे रोखण्यास मदत होईल, असे काहींचे म्हणणे आहे. या निर्णयामुळे अल्बमा राज्यातील अनेक आयव्हीएफ केंद्रे बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या निकी हॅले यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, माझ्यासाठी भ्रूण म्हणजे मूलच असून कोर्टाच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. (USA)
Latest Marathi News सुरक्षित भ्रूणाला मूलच मानले जाईल Brought to You By : Bharat Live News Media.
