भंडारा : शिवशाही- दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

भंडारा; Bharat Live News Media वृत्तसेवा : शिवशाही बस व दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात तरूणाचा मृत्यू झाला. हा अपघात मोहाडी येथील सुलोचनादेवी पारधी विद्यालयासमोरील राज्य मार्गावर गुरुवारी (दि.२२) सायंकाळी सव्वाआठच्या सुमारास घडला. राहुल नंदू मेश्राम (वय ३०, रा. हरदोली ) असे या मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, नागपूरहून तुमसरकडे येत असलेल्या शिवशाही बसची समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात राहुल मेश्राम या तरूणाचा मृत्यू झाला. ही धडक इतकी जोरदार होती की, बसच्या समोरील एका बाजूचा भाग तुटून पडला. तसेच दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी राहूलला रुग्णालयात दाखल केले होते, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पुढील तपास मोहाडी पोलिस करीत आहेत.
हेही वाचा :
Nashik Accident : हिंगणवेढे येथे शेत मजुरांच्या गाडीला अपघात, दोन मजुरांचा मृत्यू; अनेक जखमी
Avalanche in Gulmarg | गुलमर्गमध्ये हिमस्खलनात परदेशी पर्यटकाचा मृत्यू
राधानगरी येथे अपघात : एका भावाचा मृत्यू, दुसरा अत्यवस्थ
Latest Marathi News भंडारा : शिवशाही- दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.
