तीन गावठी पिस्तूल, आठ जिवंत काडतूसासह तिघे पोलीसांच्या जाळ्यात

जळगाव Bharat Live News Media वृत्तसेवा ; चोपडा तालुक्यातील बुधगाव रोडने कार मधून तीन गावठी पिस्तूल, आठ जिवंत काडतूससह तीन संशयितांना चोपडा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून आठ लाख 82 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चोपडा ग्रामीण पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की एका गाडीतून अवैध हत्यार नेण्यात येत आहे. त्यानुसार चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक कावरी कमलाकर, पोलीस नाईक शशिकांत पारधी, पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण धनगर, सहायक फौजदार राजू महाजन, देविदास ईशी, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पारधी, विनोद पवार, महेंद्र भिल, संदीप निळे, श्रावण तेली, संजय चौधरी या पथकाने शुक्रवार दि. २३ रोजी मध्यरात्री २ वाजता चोपडा तालुक्यातील बुधगाव येथे सापळा रचला. त्यावेळी पोलिसांनी कार क्रमांक एमएच-१२ आरएफ १४९६ हीला तपासणी साठी थांबविले असता कारची झाडाझडती घेतली असता तीन जणांकडून ३ गावठी पिस्तूल आणि ८ जिवंत काडतूस झाडाझडतीमध्ये मिळून आल्या. पोलीसांनी जफर रहीम शेख वय-३३, तबेज ताहीर शेख व-२९ आणि कलीम अब्दुल रहमान सय्यद वय-३४ तिघे रा. शिरूर जि.पुणे या तिघांना अटक केली. पोलीसांनी गुन्ह्यात वापरलेली कार, ३ गावठी पिस्तूल आणि ८ जिवंत काडतूस असा एकुण ८ लाख ८२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्याविरोधात चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, डीवायएसपी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
हेही वाचा
Mard Doctors Strike : राज्यात मार्ड डाॅक्टरांचा संप सुरूच; पहिल्या दिवशी रुग्णसेवेवर परिणाम नाही
Magh Purnima 2024 : माघी पौर्णिमेला नदीत स्नान का करतात? जाणून घ्या पूजा आणि महत्त्व
पंकज भुजबळांचा ताफा अडविल्याने भुजबळ आक्रमक; म्हणाले, आम्ही कुणालाही…
Latest Marathi News तीन गावठी पिस्तूल, आठ जिवंत काडतूसासह तिघे पोलीसांच्या जाळ्यात Brought to You By : Bharat Live News Media.
