परभणी : जनार्धन आवरगंड यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर

पूर्णा‌, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील माखणी येथील प्रयोगशील शेतकरी जनार्धन बालासाहेब आवरगंड यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) जाहीर झाला आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. माखणी येथील जनार्धन आवरगंड यांनी मागील काही वर्षांपासून शेतीत कमी खर्चात कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारे शेतीप्रयोग राबवले आहे. त्याच बरोबर सेंद्रीय शेती, फळबाग … The post परभणी : जनार्धन आवरगंड यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर appeared first on पुढारी.

परभणी : जनार्धन आवरगंड यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर

पूर्णा‌, Bharat Live News Media वृत्तसेवा: तालुक्यातील माखणी येथील प्रयोगशील शेतकरी जनार्धन बालासाहेब आवरगंड यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) जाहीर झाला आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो.
माखणी येथील जनार्धन आवरगंड यांनी मागील काही वर्षांपासून शेतीत कमी खर्चात कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारे शेतीप्रयोग राबवले आहे. त्याच बरोबर सेंद्रीय शेती, फळबाग व विविध शेती उत्पादीत कच्या मालापासून आंबा लोणचे, सुगंधी उटणे, तीळ लाडू, मसाले, चटण्या आदी प्रक्रिया युक्त उपपदार्थ निर्मिती केली आहे. ओंकार गृह उद्योगा‌अंतर्गत शेती सेवा ग्रुपच्या माध्यमातून उत्तम विक्री व्यवस्थापन केले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन पुरस्कारासाठी निवड केली आहे.
पूर्णा तालुक्यातील शेतकरी होतकरु असून प्रयोगशील आहेत. दोन वर्षात तालुक्यातील तीन शेतक-यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाले आहेत. यात, धानोरा काळे येथील प्रतापराव काळे, मरसूळ‌‌ येथले देवरावजी शिंदे आणि आता माखणीचे जनार्धन आवरगंड यांना पुरस्कार मिळाला आहे.
निलेश आडसुळे, तालुका कृषी अधिकारी, पूर्णा
हेही वाचा 

परभणी : वेतनश्रेणीच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
परभणी : सेलूत शासकीय कापूस खरेदीला अल्प प्रतिसाद; पेरानोंद ठरते अडसर
परभणी : मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान; शांताबाई नखाते आश्रमशाळा सेलू तालुक्यात प्रथम

Latest Marathi News परभणी : जनार्धन आवरगंड यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर Brought to You By : Bharat Live News Media.