अवैध वाहतूक करणारे ट्रक जप्त, 34 म्हशींची सुटका

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- मध्यप्रदेश मधून महाराष्ट्रात येत असताना आरटीओ बॅरेक खानापूर या ठिकाणी तीन आयशर ट्रक मधून 34 म्हशी अत्यंत दयनीय अवस्थेत मिळून आल्या. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध रावेर पोलिसांमध्ये प्राणी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरटीओ विभागाचे खानापूर जवळ असलेले बॅरेक रोडवर सार्वजनिक ठिकाणी आयशर क्रमांक एम … The post अवैध वाहतूक करणारे ट्रक जप्त, 34 म्हशींची सुटका appeared first on पुढारी.

अवैध वाहतूक करणारे ट्रक जप्त, 34 म्हशींची सुटका

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा- मध्यप्रदेश मधून महाराष्ट्रात येत असताना आरटीओ बॅरेक खानापूर या ठिकाणी तीन आयशर ट्रक मधून 34 म्हशी अत्यंत दयनीय अवस्थेत मिळून आल्या. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध रावेर पोलिसांमध्ये प्राणी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरटीओ विभागाचे खानापूर जवळ असलेले बॅरेक रोडवर सार्वजनिक ठिकाणी आयशर क्रमांक एम पी झिरो ०९ जी एफ ०८७१,  एमपी 41 जी ए ३०२९, जी जे ०४ एन एस २००४ प्रत्येकी पाच लाख रुपये किमतीच्या तीन वाहनांमध्ये वेगवेगळ्या अशा 34 म्हशी कोणत्याही वैद्यकीय प्रमाणपत्रा शिवाय अत्यंत निर्दयतेने पाणी व चाऱ्या शिवाय वाहनांमध्ये कोंबून कत्तल खान्याकडे चालवल्या होत्या. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दीपक ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसांत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल राजेंद्र राठोड करीत आहे.
हेही वाचा :

मगरीच्या पोटातून निघाली नाणी!
पुणे आरटीओ कार्यालयात तुंबळ हाणामारी; टॅक्सी संघटनांमध्ये राडा 

Latest Marathi News अवैध वाहतूक करणारे ट्रक जप्त, 34 म्हशींची सुटका Brought to You By : Bharat Live News Media.