व्यवसायासाठी कर्जाचे आमिष दाखवून विधवा महिलांना 6 लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- व्यवसायासाठी विनापरतावा ५० हजार रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे भासवून दोन महिलांनी विधवा महिलांना सहा लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुही नियामत पठाण (३०, रा. अमरदीप सोसायटी, बापू बंगला, इंदिरानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, ‘संशयित आरोपी नगमा रफिक सय्यद (रा. भारतनगर, मुंबई नाका) व निलोफर आझाद शेख … The post व्यवसायासाठी कर्जाचे आमिष दाखवून विधवा महिलांना 6 लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

व्यवसायासाठी कर्जाचे आमिष दाखवून विधवा महिलांना 6 लाखांचा गंडा

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- व्यवसायासाठी विनापरतावा ५० हजार रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे भासवून दोन महिलांनी विधवा महिलांना सहा लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुही नियामत पठाण (३०, रा. अमरदीप सोसायटी, बापू बंगला, इंदिरानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, ‘संशयित आरोपी नगमा रफिक सय्यद (रा. भारतनगर, मुंबई नाका) व निलोफर आझाद शेख (रा. रेणुकानगर, नाशिक) यांनी संगनमत करून फिर्यादी पठाण यांना विधवा महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी बिगरफेडीचे ५० हजार रुपये कर्ज मिळवून देण्याचे भासविले. तसेच या योजनेकरिता फिर्यादीसह इतर गरजवंत महिलांकडून प्रत्येकी हजार रुपये प्रोसेसिंग फी जमा केली. त्यानंतर बिगरफेडीचे कर्ज मंजूर करण्याचे भासवून कोणतेही कर्ज मंजूर न करता फिर्यादी पठाण यांच्यासह इतर महिलांकडून घेतलेली सहा लाख रुपयांची रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरून विधवा महिलांची फसवणूक केली.
सदर प्रकार १ नोव्हेंबर २०२२ ते ३१ आॅगस्ट २०२३ या कालावधीत रेणुकानगर येथे घडला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात नगमा सय्यद व नीलोफर शेख यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :

‘या’ ठिकाणाला म्हणतात ‘डायनासोरची राजधानी’
Sonu Sood : रेस्टॉरंटमध्ये ती चिठ्ठी हाती आली अन्‌ सोनू सूदने…
Vijay Vadettiwar : कंपन्यांना धमकावत भाजपने ९५ टक्के हेलिकॉप्टर केली बुक : विजय वडेट्टीवार

Latest Marathi News व्यवसायासाठी कर्जाचे आमिष दाखवून विधवा महिलांना 6 लाखांचा गंडा Brought to You By : Bharat Live News Media.