पुणे आरटीओ कार्यालयात तुंबळ हाणामारी; टॅक्सी संघटनांमध्ये राडा 

पुणे, पुढारी वृत्तसेवा : आरटीओ कार्यालयात आज (दि.२३) सायंकाळच्या सुमारास आयोजित केलेल्या ओला उबेर दराबाबतच्या बैठकीनंतर उपस्थित टॅक्सी संघटनांची आपापसातच जोरदार जुंपली. यावेळी फ्री स्टाईल हाणामारी करत संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये तोडफोड केली. Pune RTO मागील काही दिवसांपासून ओला उबेर टॅक्सी चालकांची नवे भाडे दर निश्चित करण्याबाबत मागणी सुरू आहे. यासाठी सात ते आठ … The post पुणे आरटीओ कार्यालयात तुंबळ हाणामारी; टॅक्सी संघटनांमध्ये राडा  appeared first on पुढारी.

पुणे आरटीओ कार्यालयात तुंबळ हाणामारी; टॅक्सी संघटनांमध्ये राडा 

पुणे, Bharat Live News Media वृत्तसेवा : आरटीओ कार्यालयात आज (दि.२३) सायंकाळच्या सुमारास आयोजित केलेल्या ओला उबेर दराबाबतच्या बैठकीनंतर उपस्थित टॅक्सी संघटनांची आपापसातच जोरदार जुंपली. यावेळी फ्री स्टाईल हाणामारी करत संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये तोडफोड केली. Pune RTO
मागील काही दिवसांपासून ओला उबेर टॅक्सी चालकांची नवे भाडे दर निश्चित करण्याबाबत मागणी सुरू आहे. यासाठी सात ते आठ संघटना प्रयत्न करत आहेत. या संदर्भातील एक बैठक नुकतीच जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी टॅक्सी चालकांची मते एक सारखी नसल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी आरटीओ कार्यालयात या संदर्भात एक बैठक घेण्याबाबत सांगितले होते. त्यानुसार आज सायंकाळी पाचच्या सुमारास सर्व टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी आरटीओ कार्यालयात जमले. Pune RTO
बैठक सुरू झाल्यानंतर सर्वांनी आरटीओ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ही चर्चा संपन्न झाल्यानंतर बैठकीतून आरटीओ अधिकारी बाहेर पडले. त्यानंतर काही संघटनांचे अंतर्गत वाद झाल्यामुळे कार्यालयातील कॉन्फरन्स रूममध्येच तुंबळ हाणामारी सुरू झाली. यात कॉन्फरन्स रूममधील काचांची तोडफोड करत खुर्च्यांची फेकाफेक करण्यात आल्या. यावेळी आरटीओ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही फ्री स्टाईल भांडणे सोडवण्यासाठी प्रयत्न केले आणि संबंधित संघटनांना कार्यालयाबाहेर जाण्यास सांगितले.
त्यानंतरकार्यालयाच्या परिसरातच पुन्हा फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरटीओ अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना बोलावले. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी काही संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. टॅक्सी दरवाढीबाबत श्रेयवाद घेण्यावरून हे वाद झाले असल्याची चर्चा आरटीओच्या वर्तुळात जोरदार रंगली आहे.
याबाबत आरटीओ अधिकारी म्हणाले की, आम्हाला संघटनांचे मध्यस्थी म्हणून ही मीटिंग घेण्यास सांगितले होते. ओला-उबेर टॅक्सी दराबाबत संघटनांचे एक मत होत नसल्यामुळे ही मीटिंग आरटीओ कार्यालयात घेण्यात आली होती. मीटिंग संपल्यानंतर आम्ही बाहेर पडलो. त्यावेळी आतमध्ये कोणत्या कारणावरून वाद झाला. याबाबत आम्हाला माहित नाही. मात्र, कार्यालयात अशाप्रकारे हाणामारी करून तोडफोड करणे चुकीचे आहे. याबाबत आम्ही पोलिसांना कळवले आहे.
हेही वाचा 

पुणे-नाशिक रेल्वेमार्ग संगमनेर तालुक्यातूनच न्या! आ. सत्यजीत तांबे
ड्रग्जचा कोडवर्ड : ‘न्यू पुणे जॉब’ म्हणजेच मेफेड्रॉन!
कुपवाडमध्ये ३०० कोटींचे ड्रग्ज जप्त; पुणे पोलिसांची कारवाई

Latest Marathi News पुणे आरटीओ कार्यालयात तुंबळ हाणामारी; टॅक्सी संघटनांमध्ये राडा  Brought to You By : Bharat Live News Media.