पंकज भुजबळांचा ताफा अडविल्याने भुजबळ आक्रमक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ काल मालेगाव दौऱ्यावर असताना मराठा आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवला. त्यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे त्यांना माघारी फिरावे लागले. या घटने नंतर मंत्री छगन भुजबळ हे आक्रमक झाले असून त्यांनी त्यावर प्रतिक्रीया दिली आहे. पंकज भुजबळ यांना अडवले ते कोण लोक होते, काय होते हे … The post पंकज भुजबळांचा ताफा अडविल्याने भुजबळ आक्रमक appeared first on पुढारी.

पंकज भुजबळांचा ताफा अडविल्याने भुजबळ आक्रमक

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ काल मालेगाव दौऱ्यावर असताना मराठा आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवला. त्यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे त्यांना माघारी फिरावे लागले. या घटने नंतर मंत्री छगन भुजबळ हे आक्रमक झाले असून त्यांनी त्यावर प्रतिक्रीया दिली आहे.
पंकज भुजबळ यांना अडवले ते कोण लोक होते, काय होते हे बघितले पाहिजे, मराठा समाजाचे लोक होते का हे पोलिसांनी बघावे. तसेच तसेच मी काही व्हिडिओ बघितले. भुजबळ कुटुंबीय आले तर त्यांना मारा, असे वक्तव्य केले जात आहे. भुजबळ कुटुंबीय घाबरत नाही, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले आहे, घाबरणार नसल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले.
भुजबळ म्हणाले, पंकज भुजबळ यांचा ताफा अडविण्याचे कारण नाही. निवडणूक प्रचारासाठी लोक गावात जातील, त्यांना अडवणे लोकशाहीला धरून नाही. आरक्षण दिल्यानंतर आंदोलन का? आम्ही विरोध केला असता तर आंदोलन केले तर ठीक होते. जरांगेंना कोण चुकीचा सल्ला देत आहे हे लवकरच बाहेर येईल. लग्नाचे मुहूर्त पुढे ढकला. निवडणूकही पुढे ढकला असे जरांगे सांगत आहेत. यावर आपण काय बोलावे, त्यांना जे नेता मानतात अशा सर्व लोकांना माझा नमस्कार, असे म्हणत भुजबळांनी हसत हसत जरांगे आणि त्यांच्या समर्थकांना हात जोडले.
हेही वाचा ;

Yodha Film : राशी खन्ना-सिद्धार्थ मल्होत्राच्या योद्धामधील गाण्याचा टीझर आऊट
Nashik News : ३ हजार विद्यार्थीनींची शैक्षणिक वाट सुकर, दारापुढे आली सायकल

Latest Marathi News पंकज भुजबळांचा ताफा अडविल्याने भुजबळ आक्रमक Brought to You By : Bharat Live News Media.