किरण राव आणतेय नवा चित्रपट, ‘लापता लेडीज’ यादिवशी येणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : जिओ स्टुडिओ आणि आमिर खान प्रॉडक्शन्स यांनी किरण राव दिग्दर्शित बहुप्रतीक्षित चित्रपट ‘लापता लेडीज’ (Laapataa Ladies Movie) प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली आहे. १ मार्च २०२४ रोजी ‘लापता लेडीज’ सिनेगृहांमध्ये दाखल होत आहे. (Laapataa Ladies Movie) संबंधित बातम्या – IFFI2023 : चित्रपटांमध्ये समांतर-व्यावसायिक भेद नको : सनी देओल Animal Trailer : … The post किरण राव आणतेय नवा चित्रपट, ‘लापता लेडीज’ यादिवशी येणार appeared first on पुढारी.

किरण राव आणतेय नवा चित्रपट, ‘लापता लेडीज’ यादिवशी येणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : जिओ स्टुडिओ आणि आमिर खान प्रॉडक्शन्स यांनी किरण राव दिग्दर्शित बहुप्रतीक्षित चित्रपट ‘लापता लेडीज’ (Laapataa Ladies Movie) प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली आहे. १ मार्च २०२४ रोजी ‘लापता लेडीज’ सिनेगृहांमध्ये दाखल होत आहे. (Laapataa Ladies Movie)
संबंधित बातम्या –

IFFI2023 : चित्रपटांमध्ये समांतर-व्यावसायिक भेद नको : सनी देओल
Animal Trailer : रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’ चा ट्रेलर ‘या’ दिवशी भेटीला
Sonam Kapoor : माझी आई एक मॉडेल, तिनेच मला फॅशनच्या जगासमोर आणलं

किरण राव यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातील विनोदी जगाची एक आनंददायी झलक या चित्रपटाच्या टीझरमधून सिनेप्रेक्षकांपर्यंत आधीच पोहोचली आहे. अलीकडेच प्रतिष्ठित ‘टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल्स’मध्ये ‘लापता लेडीज’ चित्रपट दाखविण्यात आला. त्यानंतर प्रेक्षकांनी उभे राहून चित्रपटाच्या दिग्दर्शिका किरण राव यांना मानवंदना दिली, अशा पद्धतीने या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती प्राप्त करीत जागतिक स्तरावर अमिट छाप उमटवली आहे.
एका नवीन पोस्टरसह या विनोदी, रंजक अशा चित्रपटाची प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली आहे. किरण राव यांनी दिग्दर्शित केलेला हा दुसरा चित्रपट आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Jio Studios (@officialjiostudios)

जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘लापता लेडीज’ चित्रपटाचे दिग्दर्शन किरण राव यांनी केले आहे. आमिर खान आणि ज्योती देशपांडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट आमिर खान प्रॉडक्शन्स आणि ‘किंडलिंग प्रॉडक्शन्स’च्या बॅनर अंतर्गत बनविण्यात आला आहे.
चित्रपटाची पटकथा बिप्लब गोस्वामी यांच्या पुरस्कार विजेत्या कथेवर आधारित आहे. चित्रपटाची पटकथा आणि संवाद स्नेहा देसाई यांचे असून, अतिरिक्त संवाद दिव्यानिधी शर्मा यांनी लिहिले आहेत.
The post किरण राव आणतेय नवा चित्रपट, ‘लापता लेडीज’ यादिवशी येणार appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : जिओ स्टुडिओ आणि आमिर खान प्रॉडक्शन्स यांनी किरण राव दिग्दर्शित बहुप्रतीक्षित चित्रपट ‘लापता लेडीज’ (Laapataa Ladies Movie) प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली आहे. १ मार्च २०२४ रोजी ‘लापता लेडीज’ सिनेगृहांमध्ये दाखल होत आहे. (Laapataa Ladies Movie) संबंधित बातम्या – IFFI2023 : चित्रपटांमध्ये समांतर-व्यावसायिक भेद नको : सनी देओल Animal Trailer : …

The post किरण राव आणतेय नवा चित्रपट, ‘लापता लेडीज’ यादिवशी येणार appeared first on पुढारी.

Go to Source