राशी खन्ना-सिद्धार्थ मल्होत्राच्या योद्धामधील गाण्याचा टीझर आऊट

Bharat Live News Media ऑनलाईन : राशी खन्ना आणि सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर योद्धाच्या पहिल्या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. (Yodha Film) प्रेक्षकांना चित्रपटाच्या सोबतीने गाण्याची उत्सुकता लागली आहे. ‘जिंदगी तेरे नाम’ या गाण्याच्या टीझरमध्ये अष्टपैलू अभिनेत्री राशी खन्ना आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यातील खास केमिस्ट्रीची झलक पाहायला मिळतेय. (Yodha Film)
संबंधित बातम्या –
Sonu Sood : रेस्टॉरंटमध्ये ती चिठ्ठी हाती आली अन् सोनू सूदने…
Bhushan Prdhan-Shivani surve : अरेन्ज मॅरेज ही लव्ह स्टोरी बनू शकते? भूषण-शिवानीचा चित्रपट ऊन-सावली
HBD Karan Singh Grover: माझ्या हसण्याचं कारण तूच आहेस म्हणत बिपाशाने करणला केलं विश (Video)
राशी आणि सिद्धार्थ यांची ऑनस्क्रीन झलक पडद्यावर बघायला मिळणार आहे. एकत्र गाण्याच्या टीझरने प्रेक्षकांना या गाण्याची छोटी झलक दाखवली आहे. २४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणारे हे गाणं प्रेक्षकांच्या मनाला भावून जाणार यात शंका नाही. हे सुंदर गाणं कौशल किशोर यांनी लिहिले आहेत आणि ते विशाल मिश्रा यांनी गायले आहे. सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा दिग्दर्शित योद्धा १५ मार्च, २०२४ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. राशीचा सिद्धार्थ मल्होत्रासोबतचा हा पहिला प्रोजेक्ट ठरणार आहे.
‘योद्धा’ मधील राशीला बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सोबतीला राशीच्या आगामी प्रोजेक्टसाठी ते आतुरतेने वाट बघत आहेत. राशी ‘द साबरमती रिपोर्ट’ आणि ‘टीएमई’ मध्ये विक्रांत मेसीसोबत दिसणार आहे. शाहिद कपूर-स्टार ‘फर्जी २’ मध्येही ती पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
A post shared by Raashii Khanna (@raashiikhanna)
View this post on Instagram
A post shared by Raashii Khanna (@raashiikhanna)
View this post on Instagram
A post shared by Raashii Khanna (@raashiikhanna)
View this post on Instagram
A post shared by Raashii Khanna (@raashiikhanna)
Latest Marathi News राशी खन्ना-सिद्धार्थ मल्होत्राच्या योद्धामधील गाण्याचा टीझर आऊट Brought to You By : Bharat Live News Media.
