रूटचा अद्भुत विक्रम! ‘असा’ पराक्रम करणारा पहिला इंग्लंडचा फलंदाज ठरला

पुढारी ऑनलाईन डेस्क : Joe Root New Record : अनुभवी फलंदाज जो रूटने इंग्लंड संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये एक अप्रतिम विक्रम नोंदवला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50+ धावा करणारा तो इंग्लंडचा पहिला फलंदाज ठरला आहे. भारताविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्याच्या पहिल्या डावात रूटने अर्धशतक झळकावले. यासह तो इंग्लंडसाठी विशेष कामगिरी करण्यात यशस्वी … The post रूटचा अद्भुत विक्रम! ‘असा’ पराक्रम करणारा पहिला इंग्लंडचा फलंदाज ठरला appeared first on पुढारी.

रूटचा अद्भुत विक्रम! ‘असा’ पराक्रम करणारा पहिला इंग्लंडचा फलंदाज ठरला

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Joe Root New Record : अनुभवी फलंदाज जो रूटने इंग्लंड संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये एक अप्रतिम विक्रम नोंदवला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50+ धावा करणारा तो इंग्लंडचा पहिला फलंदाज ठरला आहे. भारताविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्याच्या पहिल्या डावात रूटने अर्धशतक झळकावले. यासह तो इंग्लंडसाठी विशेष कामगिरी करण्यात यशस्वी ठरला.
रूटने माजी इंग्लिश कर्णधार ॲलिस्टर कूकचा विक्रम मोडला आहे. त्याने 91व्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून 50+ धावा केल्या. कुकने कसोटी क्रिकेटमध्ये 90 वेळा अशी कामगिरी केली आहे. रूटने रांची येथे भारताविरुद्ध 31 वे शतक झळकावले. त्याच्या बॅटमधून 59 अर्धशतके झाली आहेत. अशा प्रकारे तो 91 वेळा पन्नास प्लस धावा करण्यात यशस्वी झाला असून त्याने कूकला मागे टाकले. (Joe Root New Record)
हा महान फलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये 90 पेक्षा जास्त वेळा 50 पेक्षा जास्त धावांची इनिंग खेळणारा जगातील सहावा फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकर, जॅक कॅलिस, रिकी पाँटिंग, राहुल द्रविड आणि शिवनारायण चंद्रपॉल यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 91 किंवा त्याहून अधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावांची खेळी खेळली आहे. सचिन, कॅलिस आणि पाँटिंग यांनी हा पराक्रम 100 हून अधिक वेळा केला आहे. सचिन तेंडुलकर हा एकमेव फलंदाज आहे ज्याने 110 पेक्षा जास्त वेळा हा पराक्रम केला आहे. (Joe Root New Record)
जो रूट आतापर्यंत या मालिकेत इतका प्रभावी दिसला नव्हता. तो बॅझबॉल स्टाईल खेळत होता आणि सतत खराब शॉट्स खेळून आऊट होत होता. मात्र, रांचीमध्ये त्याने बॅझबॉल स्टाईलला सोडचिठ्ठी दिल्याचे स्पष्टपणे दिसले आणि संयमी खेळी करत त्याने मालिकेतील पहिले शतक पूर्ण केले.
Latest Marathi News रूटचा अद्भुत विक्रम! ‘असा’ पराक्रम करणारा पहिला इंग्लंडचा फलंदाज ठरला Brought to You By : Bharat Live News Media.