भाजपचेही अनेक नेते आमच्या संपर्कात: नाना पटोले

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही सज्ज असून आमचे भाजपला किती नेते न्यायचे, ते घेऊन जाऊ द्या, ही सत्तेची मस्ती फार काळ चालणार नाही. त्यांचेही अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. याविषयी त्यांना कल्पना नाही, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
महाविकास आघाडीची बहुतांशी मतदारसंघ चर्चा झाली आहे. जागा वाटपाबाबत 27, 28 फेब्रुवारीपर्यंत चित्र स्पष्ट होईल. पुण्याला 24 रोजी महाविकास आघाडीची सभा असून महाविकास आघाडी राज्यात 42 जागा जिंकेल, असा दावा पटोले यांनी केला.
दिल्लीच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांबाबत छेडले असता भाजपा शेतकरी विरोधी आहे. दिल्लीत ते दिसून येत आहे. भाजपाला राज्यातून कस हाकलता येईल, हे महाविकास आघाडी बघत आहे. अॅड प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चेची प्रक्रिया सुरू आहे. आमच्या सोबतच राहतील, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.
हेही वाचा
मनोहर जोशी यांच्या निधनाने निष्ठावंत, अनुभवी, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; नाना पटोले
मोदी सरकारला शेतकरीच सत्तेवरून खाली खेचणार : नाना पटोले
Ashok Chavan Resign : नाना पटोलेंचा अशोक चव्हाणांना टोला, म्हणाले; ‘सर्वकाही मिळालेले नेते..’
Latest Marathi News भाजपचेही अनेक नेते आमच्या संपर्कात: नाना पटोले Brought to You By : Bharat Live News Media.
