संकट काळात मनोहर जोशी शिवसेनेसोबत राहिले: उद्धव ठाकरे

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : असेच जीवाला जीव देणारे कार्यकर्ते त्यावेळी होते आणि आता देखील आहेत, म्हणून शिवसेना प्रत्येक संकटावर मात करून पूर्ण उभारी घेऊन उभी राहत आहे, असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी आज (दि.२३) केले. ते पत्रकारांशी बोलत होते. Uddhav Thackeray
कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने ते आज बुलडाणा अर्थात विदर्भ दौऱ्यावर आले होते. दुसरीकडे नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील पूर्व विदर्भातील मेळावा आज मनोहर जोशी यांच्या निधनानंतर स्थगित करण्यात आला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, लोकसभेचे अध्यक्ष होते, केंद्रीय मंत्री होते, पण त्याहीपेक्षा ते सच्चे शिवसैनिक होते. व्यक्तीच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. संकट काळात देखील ते शिवसेनेसोबत राहिले. एक शिवसैनिक आपल्यातून निघून जात आहे, हे फार दुर्दैवी आहे. शिवसेना परिवाराच्या वतीने आणि ठाकरे परिवाराच्या वतीने मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
दरम्यान, मनोहर जोशी यांच्या निधनामुळे आजचा दौरा रद्द करून मुंबईकडे जाणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.
हेही वाचा
मनोहर जोशी यांच्या निधनाने निष्ठावंत, अनुभवी, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; नाना पटोले
Manohar Joshi : मनोहर जोशी अखेरच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून जगले : संजय राऊत
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना ह्रदयविकाराचा झटका; रूग्णालयात उपचार सुरू
Latest Marathi News संकट काळात मनोहर जोशी शिवसेनेसोबत राहिले: उद्धव ठाकरे Brought to You By : Bharat Live News Media.
