सत्ताधाऱ्यांना हाकलण्यासाठी तुतारी हा शुभ संकेत : विजय वडेट्टीवार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शरद पवार यांच्या पक्षाने तुतारी चिन्ह वाजवण्यासाठीच घेतले आहे. सत्ताधारी यांना राज्यातून बाहेर हाकलून लावण्यासाठी शरद पवारांनी तुतारी हाती घेतली आहे. मुळात आनंदाच्या क्षणी तुतारी वाजवली जाते, हा शुभ संकेत आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. (Sharad Pawar NCP Tutari Sign) संबंधित बातम्या :  सावध ऐका पुढल्या हाका; … The post सत्ताधाऱ्यांना हाकलण्यासाठी तुतारी हा शुभ संकेत : विजय वडेट्टीवार appeared first on पुढारी.

सत्ताधाऱ्यांना हाकलण्यासाठी तुतारी हा शुभ संकेत : विजय वडेट्टीवार

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : शरद पवार यांच्या पक्षाने तुतारी चिन्ह वाजवण्यासाठीच घेतले आहे. सत्ताधारी यांना राज्यातून बाहेर हाकलून लावण्यासाठी शरद पवारांनी तुतारी हाती घेतली आहे. मुळात आनंदाच्या क्षणी तुतारी वाजवली जाते, हा शुभ संकेत आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. (Sharad Pawar NCP Tutari Sign)
संबंधित बातम्या : 

सावध ऐका पुढल्या हाका; ‘तुतारी’ चिन्हावर सुप्रिया सुळेंची पोस्ट चर्चेत
महाराष्ट्र एका सुसंस्कृत, व्यासंगी नेत्याला मुकला; मुख्यमंत्री शिंदेंनी मनोहर जोशींना वाहिली श्रद्धांजली
मनोहर जोशी : संघर्षाच्या भट्टीत तावून सुलाखून निघालेला शिवसेनेचा ‘चाणक्य’
मनोहर जोशी अखेरच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून जगले : संजय राऊत

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला सोबत घेण्यासाठी आमचे शर्थीचे प्रयत्न सूरू आहेत. त्यांच्यासोबत राहण्यासाठी ते म्हणतील त्याप्रमाणे चर्चेला तयार आहोत. प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. चर्चेच्या फेऱ्या शेवटपर्यंत चालत असतात, आम्ही घाई न करता आघाडीची काय भूमिका आहे, त्यावरून आमचं ठरवू, असे ते म्हणाले. जिथे नंबर दोन वर होते, मात्र आता ज्यांना उमेदवारी मिळणार नाहीत. त्यापैकी बरेच जण आमच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला. (Sharad Pawar NCP Tutari Sign)
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले. हेडमास्तर सारखी त्यांची भूमिका होती. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत ते निष्ठेने सेवा करत राहिले. मला त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली. मी १९८६ चा शिवसैनिक आहे. ते नेहमी बाळासाहेबांना सांगायचे की, विजयला आमदार करायचं आहे. १९८८ मध्ये माझी शिफारस केली आणि महामंडळाच्या यादीत माझं पहिलं नाव देऊन १९९५ साली मंत्री केले अशी आठवण वडेट्टीवार यांनी काढली. शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारे, उत्तम मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात समर्पित नोंद असलेल्या नेत्याला महाराष्ट्र आज मुकला असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
हेही वाचा : 

मनोहर जोशी यांच्या निधनाने सुसंस्कृत नेतृत्व हरपले; नाना पटोले
मनोहर जोशींचे ‘छत्रपती संभाजीनगर’शी होते खास नाते, जाणून घ्या त्याविषयी
‘ते नेहमीच एकनिष्ठ राहिले’; जोशींच्या निधनावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Latest Marathi News सत्ताधाऱ्यांना हाकलण्यासाठी तुतारी हा शुभ संकेत : विजय वडेट्टीवार Brought to You By : Bharat Live News Media.