पंतप्रधान मोदींच्या हस्ते जैताणे ग्रामीण रुग्णालय नुतन इमारतीचा ई-लोकार्पण सोहळा

धुळे : पुढारी वृत्तसेवा- जैताणे, ता. साक्री येथील नुतन ग्रामीण रुग्णालय इमारतीचा ई-लोकार्पण सोहळा रविवार, (दि. 25) दुपारी 4.45 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट येथून होणार आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगांवकर यांनी दिली आहे. या समारंभास दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया, … The post पंतप्रधान मोदींच्या हस्ते जैताणे ग्रामीण रुग्णालय नुतन इमारतीचा ई-लोकार्पण सोहळा appeared first on पुढारी.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते जैताणे ग्रामीण रुग्णालय नुतन इमारतीचा ई-लोकार्पण सोहळा

धुळे : Bharat Live News Media वृत्तसेवा- जैताणे, ता. साक्री येथील नुतन ग्रामीण रुग्णालय इमारतीचा ई-लोकार्पण सोहळा रविवार, (दि. 25) दुपारी 4.45 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट येथून होणार आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगांवकर यांनी दिली आहे.
या समारंभास दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत हे उपस्थित राहणार आहे. तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, खासदार डॉ. सुभाष भामरे, खासदार डॉ. हिना गावित, आमदार अमरिशभाई पटेल, आ.किशोर दराडे, आ. सत्यजित तांबे, आ.जयकुमार रावल, आ.काशिराम पावरा, आ.कुणाल पाटील, आ. मंजुळा गावित, आ. फारुख शहा, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव नवीन सोना, आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक धीरज कुमार, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, अधिक्षक अभियंता देवेंद्र पवार, आरोग्य उपसंचालक डॉ. कपिल आहेर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या ई-लोकार्पण सोहळा समारंभास जिल्ह्यातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगांवकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, ग्रामीण रुग्णालय जैताणेचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. हर्षवर्धन चित्तम, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कार्यकारी अभियंता (नाशिक) अंकुश पाटील, कनिष्ठ अभियंता अक्षयकुमार देवरे, उप अभियंता मयुर देवरे यांनी केले आहे.
हेही वाचा :

आंबेगाव, शिरूरच्या 45 गावांतील पिके धोक्यात !
HBD Karan Singh Grover: माझ्या हसण्याचं कारण तूच आहेस म्हणत बिपाशाने करणला केलं विश (Video)
परभणी : सेलूत शासकीय कापूस खरेदीला अल्प प्रतिसाद; पेरानोंद ठरते अडसर

Latest Marathi News पंतप्रधान मोदींच्या हस्ते जैताणे ग्रामीण रुग्णालय नुतन इमारतीचा ई-लोकार्पण सोहळा Brought to You By : Bharat Live News Media.