रिंगरोडसाठी 31 गावांतील भूसंपादनाचे काम पूर्ण : विभागीय आयुक्तांची बैठक

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) प्रस्तावित वर्तुळाकार रस्ता (रिंगरोड) प्रकल्पातील पश्चिम मार्गावरील 34 गावांपैकी 31 गावांमधील 644 हेक्टर जमिनीचे भूसंपादनाचे काम पूर्ण झाले, तर त्यासाठी दोन हजार 975 कोटींचा निधी वितरित करण्यात आला. पूर्व मार्गावरील हवेली, मावळ, खेड आणि पुरंदरमधील जमिनीच्या भूसंपादनाबाबत जिल्हा प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले. विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी रिंगरोडसंदर्भातील कामकाजाबाबत आढावा बैठक घेतली.
या वेळी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, एमएसआरडीसीचे अप्पर जिल्हाधिकार हनुमंत अरगुंडे, पूर्वेकडील भोर, हवेली, खेड आणि पुरंदर तालुक्याचे प्रांताधिकारी, तहसीलदार, अधिकारी उपस्थित होते. या वेळी पुलकुंडवार यांनी तातडीने पूर्वेकडील गावांमध्ये नोटीस बजावून भूसंपादन करण्यास सुरुवात करावी, असे आदेश दिले. रिंगरोड प्रकल्प दोन टप्प्यातं राबविण्यात येत असून, पहिल्या टप्प्यात पश्चिम मार्गावर भोरमधील पाच, हवेलीतील 11, मुळशीतील 15 आणि मावळातील सहा गावांचा समावेश असून, एकूण 650 हेक्टर जागा निश्चित करण्यात आली होती. परंतु, पुणे-संभाजीनगर हरित मार्ग (ग्रीन कॉरिडॉर) भोर तालुक्यातील कांजळे, कोळवडे, खोपी, कांबरे आणि नायगाव या पाच गावांतून जात असल्याने त्यातील तीन गावे वगळून शिवरे गावचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे क्षेत्रफळ कमी होत नव्याने समाविष्ट गावातील जमिनीचे दर काढण्यासाठी मूल्यांकन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पूर्व मार्गावर मावळमधील 11, खेडमधील 12, हवेलीतील 15, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांचा समावेश असून, खेड तालुक्यातील भूसंपादनाबाबत बाधित गावातील शेतकर्यांना नोटीस पाठविल्या आहेत. खेडमधील स्थानिकांनी भूसंपादनाबाबत मुदतवाढीनुसार एक महिन्याचा कालावधी संपुष्टात येत असल्याने शेतकर्यांकडून स्वयंघोषणापत्र घेण्यास सुरुवात केली आहे. तर, उर्वरित मावळ तालुक्यातील 11 आणि हवेली तालुक्यातील 15 गावांबाबत तातडीने भूसंपादन करण्यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार आणि एमएसआरडीसीच्या अधिकार्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हेही वाचा
आंबेगाव, शिरूरच्या 45 गावांतील पिके धोक्यात !
‘पुरंदर उपसा’च्या पाण्यासाठी अजून 20 दिवस
शिरूरच्या स्ट्राँग रूमची जिल्हाधिकार्यांकडून पाहणी
Latest Marathi News रिंगरोडसाठी 31 गावांतील भूसंपादनाचे काम पूर्ण : विभागीय आयुक्तांची बैठक Brought to You By : Bharat Live News Media.
