राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्दची याचिका फेटाळली

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात टिप्पणी केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना झारखंड उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. २०१८ चा मानहानीचा खटला रद्द करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. आता या प्रकरणी राहुल गांधी विरोधातील खटला कनिष्ठ न्यायालयात चालणार आहे. Rahul Gandhi Rahul Gandhi  अमित शहा यांच्याबाबत वादग्रस्त … The post राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्दची याचिका फेटाळली appeared first on पुढारी.

राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्दची याचिका फेटाळली

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात टिप्पणी केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना झारखंड उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. २०१८ चा मानहानीचा खटला रद्द करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. आता या प्रकरणी राहुल गांधी विरोधातील खटला कनिष्ठ न्यायालयात चालणार आहे. Rahul Gandhi
Rahul Gandhi  अमित शहा यांच्याबाबत वादग्रस्त विधान
राहुल यांनी 2018 मध्ये बेंगळुरूमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय मिश्रा यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
ट्रायल कोर्टात सुरू असलेली कारवाई रद्द करण्यासाठी राहुल गांधी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. 16 फेब्रुवारीरोजी राहुल गांधी यांची लेखी बाजू न्यायालयात मांडण्यात आली, त्यानंतर न्यायमूर्ती अंबुज नाथ यांच्या खंडपीठाने निर्णय राखून ठेवला. 18 मार्च 2018 रोजी काँग्रेसच्या अधिवेशनादरम्यान राहुल गांधी यांनी अमित शहा यांना ‘हत्येचे आरोपी’ म्हटले होते. तसेच भाजपविरोधात भाषण केले होते, असा आरोप करत भाजपचे नेते नवीन झा यांनी गांधीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
हेही वाचा 

केंद्राकडून देशवासीयांच्या खिशावर डल्ला मारला जातोय : राहुल गांधी यांचा हल्लाबोल
BJP criticizes Rahul Gandhi : राहुल गांधी करतात भारत जोडो यात्रा, पण त्यांच्या खासदारांची देश विभागण्याची भाषा : भाजपची टीका
राहुल गांधी यांची मोठी घोषणा! सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना करणार

Latest Marathi News राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्दची याचिका फेटाळली Brought to You By : Bharat Live News Media.