आकाशातून वस्तू पडल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट

लासलगाव(जि. नाशिक) वृत्तसेवा : निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील कोटमगाव येथे वनसगाव रोडवरील एका शेतात आकाशातून बॅटरीसदृश्य वस्तू पडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घबराटीचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, येथील रंगनाथ वारुळे यांचे हे शेत आहे. त्यांच्या शेतात अचानक आकाशातून बॅटरी व लाईट असलेली वस्तू पडल्याने वारुळे वस्तीवरील शेतकऱ्यांची धावपळ उडाली. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते सचिन पवार … The post आकाशातून वस्तू पडल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट appeared first on पुढारी.

आकाशातून वस्तू पडल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट

लासलगाव(जि. नाशिक) वृत्तसेवा : निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील कोटमगाव येथे वनसगाव रोडवरील एका शेतात आकाशातून बॅटरीसदृश्य वस्तू पडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घबराटीचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील रंगनाथ वारुळे यांचे हे शेत आहे. त्यांच्या शेतात अचानक आकाशातून बॅटरी व लाईट असलेली वस्तू पडल्याने वारुळे वस्तीवरील शेतकऱ्यांची धावपळ उडाली.
यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते सचिन पवार यांनी तत्काळ लासलगाव पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच याबाबत लासलगाव पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता हवामानाची माहिती मिळविण्यासाठी हवेत सोडले जाणारे यंत्र तुटून पडल्याची माहिती देताच शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. हे यंत्र लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपासासाठी संबधित विभागाशी संपर्क सुरु केला आहे.
हेही वाचा :

PNS Ghazi : तब्बल ५३ वर्षांनंतर सापडले पाकिस्तानची पाणबुडी गाझीचे अवशेष
Manohar Joshi : मनोहर जोशींचे ‘छत्रपती संभाजीनगर’शी होते खास नाते, जाणून घ्या त्याविषयी
Avatar : The Last Airbender – ही संधी सोडू नका, अवतार : द लास्ट एयरबेंडर पाहिला का?

Latest Marathi News आकाशातून वस्तू पडल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट Brought to You By : Bharat Live News Media.