तब्बल ५३ वर्षांनंतर सापडले पाकिस्तानची पाणबुडी गाझीचे अवशेष

पुढारी ऑनलाईन डेस्क : नवीन अधिग्रहित भारतीय नौदलाच्या डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेईकल (डीएसआरव्ही) १९७१  मध्ये भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान बुडालेली पाकिस्तानाची पाणबुडी पीएनएस गाझीचे अवशेष शोधून काढले आहेत. ही पाणबुडी किनारपट्टीपासून सुमारे १०० मीटर खोलीवर आढळून आली. भारतीय नौदलाने नौदलाच्या परंपरेचे पालन करून या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या सन्मानार्थ त्याला स्पर्श केलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले. (PNS Ghazi) … The post तब्बल ५३ वर्षांनंतर सापडले पाकिस्तानची पाणबुडी गाझीचे अवशेष appeared first on पुढारी.

तब्बल ५३ वर्षांनंतर सापडले पाकिस्तानची पाणबुडी गाझीचे अवशेष

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : नवीन अधिग्रहित भारतीय नौदलाच्या डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेईकल (डीएसआरव्ही) १९७१  मध्ये भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान बुडालेली पाकिस्तानाची पाणबुडी पीएनएस गाझीचे अवशेष शोधून काढले आहेत. ही पाणबुडी किनारपट्टीपासून सुमारे १०० मीटर खोलीवर आढळून आली. भारतीय नौदलाने नौदलाच्या परंपरेचे पालन करून या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या सन्मानार्थ त्याला स्पर्श केलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले. (PNS Ghazi)
PNS Ghazi : तब्बल ५३ वर्षांनंतर सापडले अवशेष
भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान ४ डिसेंबर १९७१ रोजी बुडालेल्या पाकिस्तानी पाणबुडी पीएनएस गाझीचे अवशेष सापडले आहेत. अवशेष किनारपट्टीपासून सुमारे 2 ते 2.5 किमी अंतरावर सुमारे 100 मीटर खोलीवर आढळले आहेत. नौदलाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, दोन पाणबुड्या विझाग किनाऱ्याजवळ समुद्राच्या तळाशी पडल्या आहेत. “तथापि, नौदलाने जपानी पाणबुडीला स्पर्श केलेला नाही कारण नौदलाच्या कर्मचाऱ्यांचा ठाम विश्वास आहे की ते आत्म्यांचे अंतिम विश्रांतीस्थान आहे आणि आम्ही त्यांना शांततेत विश्रांती देऊ देतो,”. २०१८ मध्ये, भारताने बुडालेली जहाजे आणि पाणबुडी शोधून काढण्यासाठी डीप सबमर्सिबल रेस्क्यू व्हेईकल विकत घेतले होते. भारत हे तंत्रज्ञान असलेल्या १२ देशांपैकी एक आहे, ज्यामध्ये अमेरिका, चीन, रशिया आणि सिंगापूर यांचा समावेश आहे.
लोकांना वाटले भूकंप झाला, पण…
भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान ४ डिसेंबर १९७१ रोजी बुडालेल्या पाकिस्तानी पाणबुडी पीएनएस गाझीमध्ये एकूण ९३ लोक होते. या ९३ जणांमध्ये ११ अधिकारी आणि ८२ खलाशी होते. या सर्वांचा मृत्यू झाला. पाकिस्तानी नौदलासाठी प्रमुख पाणबुडी म्हणून काम करणारी पीएनएस गाझी इस्लामाबादने अमेरिकेकडून भाडेतत्त्वावर घेतली होती. भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारताच्या विशाखापट्टणम बंदराजवळ मोठा स्फोट झाला होता. या स्फोटाचा धक्का इतका जोरदार होता की बंदरावर बांधलेल्या इमारतींच्या काचाही फुटल्या होत्या. स्थानिक लोकांना भूकंप झाला असे वाटले. यावेळी समुद्रात मोठी लाट उसळली आणि नंतर ही पाणबुडी समुद्रात बुडाली. हा भूकंप नव्हता तर विशाखापट्टणम बंदरात पाकिस्तानी पाणबुडी पीएनएस गाझी होती. पाणबुडीच्या आत अंतर्गत स्फोट झाल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. आयएनएस राजपूत युद्धनौकेने ही पाकिस्तानी पाणबुडी बुडवल्याचे भारताच्या बाजूने सांगण्यात येत आहे. या पाणबुडीवर 93 पाकिस्तानी नौदल कर्मचारी होते आणि त्या सर्वांचा मृत्यू झाला.

#IndianNavy’s Deep Submergence Rescue Vehicle (DSRV) has recently located the wreckage of the Pakistani submarine ‘PNS Ghazi’ which was sunk during the 1971 Indo-Pak War near the #Vishakhapatnam coast. pic.twitter.com/2WDGvfdvFN
— News IADN (@NewsIADN) February 22, 2024

हेही वाचा 

Citylink Nashik : सिटीलिंकच्या वेगाला आता मर्यादा, शहरात कमाल ६० तर ग्रामीण भागात ‘इतकी’
Manohar Joshi : संघर्षाच्या भट्टीत तावून सुलाखून निघालेला शिवसेनेचा ‘चाणक्य’

 
Latest Marathi News तब्बल ५३ वर्षांनंतर सापडले पाकिस्तानची पाणबुडी गाझीचे अवशेष Brought to You By : Bharat Live News Media.