
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजमनात मानाचे पान मिळवत उद्याच्या रचनात्मक समाजाचे पाईक होऊ पाहणाऱ्या युवा जनांचा उद्या शनिवारी (दि.२४) दैनिक Bharat Live News Mediaतर्फे ‘युवा Bharat Live News Media’ या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. तिडके कॉलनी येथील हॉटेल एस. एस. के. सॉलिटेअर येथे दुपारी २ वाजता हा सोहळा रंगणार आहे.
सोहळ्याला पालकमंत्री दादाजी भुसे, विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे आणि ख्यातनाम दीपक बिल्डर्सचे अध्यक्ष दीपक चंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सोहळ्यात जिल्हाभरातील ३१ युवांचा सन्मान करण्यात येणार असून, या सोहळ्याच्या माध्यमातून त्यांच्या राजकीय ऊर्जेला बळ देण्याचा दै. Bharat Live News Mediaचा प्रयत्न आहे. भारताच्या लोकशाही चौकटीत रचनात्मक तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी पुरेसे धोरणात्मक लक्ष देणे गरजेचे आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे आणि सर्वात तरुण राष्ट्र म्हणून भारत पुढे आहे. राजकारण आणि लोकशाहीतील युवांच्या वाढीव सहभागाला प्राधान्य देऊन, आपली मूलभूत लोकशाही तत्त्वे मजबूत करण्यासाठी देशातील युवा शक्ती तयार केली पाहिजे. भारतीय राजकारणाला युवा सहभागाची मोठी पार्श्वभूमी असली तरी सक्रिय राजकीय सहभागातून काही प्रमाणात युवा सहभाग रोडावत चालल्याचे चित्र आहे. सोशल मीडियाच्या डिजिटल रणभूमीवर हा वर्ग काही प्रमाणात कार्यशील दिसत असला तरी त्याला असणाऱ्या अंगभूत मर्यादा आणि ट्रोल आर्मीचे येणारे स्वरूप विधायक हस्तक्षेपाच्या भूमिकेपासून दूर नेतो. तरुणाईच्या सार्वजनिक चर्चा विश्वात राजकीय अवकाश कमी होत असल्याचे ठळकपणे दिसून येत आहे. तरुणाईत राजकीय जाणिवा कमी होणे, ही सजग नागरी समाज घडविण्याच्या प्रक्रियेतील मोठी अडसर ठरणारी बाब आहे. त्यामुळे या युवांच्या पाठीवर कौतुकांची थाप गरजेची असून, ‘युवा Bharat Live News Media’ सन्मान हे त्याचे द्योतक आहे.
यांचा होणार गौरव…
अजित कड (दिंडोरी), अनिल सोनवणे (नांदगाव), बबनराव जगताप (सिन्नर), देवा सांगळे (सिन्नर), ज्ञानेश्वर गायकवाड (नाशिक), इरफान सय्यद (निफाड), जगदीश पांगारकर (सिन्नर), जगदीश गोडसे (सटाणा), कैलास पाटील (त्र्यंबकेश्वर, नाशिक), करण गायकवाड (नाशिक), नेमिनाथ सोमवंशी (पिंपरखेड, नांदगाव), नितीन सातपुते (नाशिक), पंकज खताळ-पाटील (नांदगाव) प्रशांत कड (दिंडोरी) प्रिया सांगळे (सिन्नर), राहुल पवार (नाशिक), राजेश गांगुर्डे (नाशिक), रश्मी हिरे-बेंडाळे (नाशिक), रतन चावला (नाशिक), रुपालीताई पठारे (नाशिक), संजय तुंगार (नाशिक) श्याम गोहाड (नाशिक), कल्पेश कांडेकर (नाशिक), सोमनाथ पावशे (सिन्नर), सुनील पाटील (नाशिक), वैभव गांगुर्डे (सटाणा), विकास भुजाडे (चांदवड), विनोद दळवी (नाशिक), योगेश बर्डे (दिंडोरी), योगेश आव्हाड (सिन्नर), योगेश गाडेकर (नाशिक).
हेही वाचा :
Lok Sabha Election 2024 : मतदान करताना भारतीय महिला नवऱ्याचा ‘आदेश’ मानतात का? निवडणुकांचा अभ्यास काय सांगतो?
फली सॅम नरिमन : कायदेविश्वातील पितामह
Arjun Kapoor : मी कधीही अभिनेता बनण्याचे ठरवले नव्हते; पण…
Latest Marathi News ‘युवा Bharat Live News Media‘ सन्मान सोहळा उद्या रंगणार Brought to You By : Bharat Live News Media.
