‘पीबीए’च्या अध्यक्षपदी अॅड. संतोष खामकर,अॅड. पायगुडे, अॅड. कुलकर्णी उपाध्यक्ष

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : विद्यमान कार्यकारिणीतील पदाधिकार्यांनी अध्यक्षांवर केलेले आरोप मतदार यादीतील घोळ, दोनदा लांबलेली निवडणूक आणि यामुळे वादग्रस्त ठरलेल्या वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या निवडणुकीत (पीबीए) अॅड. संतोष खामकर यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे.
पीबीएच्या सात हजार 923 सभासदांपैकी तीन हजार 947 वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला. अॅड. दादाभाऊ शेटे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. निवडणूक मुख्य आयुक्त अॅड. एन. डी. पाटील यांना निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न केले. अॅड. अमित गिरमे आणि अॅड. खामकर यांच्यात अध्यक्षपदासाठी दुहेरी लढत झाली. त्यात अॅड. खामकर यांनी मोठ्या फरकाने विजयी मिळविला, तर उपाध्यक्ष पदाच्या दोन जागांसाठी सात उमेदवारांनी नशीब अजमावले होते. त्यात अॅड. कुमार पायगुडे आणि अॅड. पवन कुलकर्णी यांनी बाजी मारली.
तसेच, सचिव पदांच्या दोन जागांसाठीची लढत सहा जणांमध्ये लढत होती. यात अॅड. मकरंद मते आणि अॅड. चेतन हरपळे विजयी झाले. ऑडिटर पदासाठी अॅड. श्रद्धा कदम, अॅड. अजिंक्य खैरे, अॅड. केदार शितोळे यांच्यात निवडणूक झाली, यात अॅड. श्रद्धा कदम यांची सगळ्यांना धोबी पछाड देत बाजी मारली. खजिनदार पदासाठी यापूर्वीच डॉ. प्रदीप चांदेरे पाटील यांची निवड झाली आहे.
कार्यकारिणी सदस्य
कार्यकारिणी सदस्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यामध्ये अॅड. अजिंक्य महाडिक, अॅड. तेजवंती कपले, अॅड. आदित्य खांदवे, अॅड. शाहीन पठाण, अॅड. सोमनाथ पोटफोडे, अॅड. रोहित गुजर, अॅड. अक्षय शितोळे, अॅड. सूरज शिंदे, अॅड. स्वप्नील चांधेरे, अॅड. अंजली बांदल यांचा समावेश आहे.
हेही वाचा
प्रवाशांची कसरत थांबणार! पीएमपी ताफ्यात 677 नव्या बस
Stretching : व्यायाम करण्यापूर्वी स्ट्रेचिंगची आवश्यकता का?
नाशिक : पाणवेली निर्मूलन मोहीम प्रभावीपणे राबवावी
Latest Marathi News ‘पीबीए’च्या अध्यक्षपदी अॅड. संतोष खामकर,अॅड. पायगुडे, अॅड. कुलकर्णी उपाध्यक्ष Brought to You By : Bharat Live News Media.
