सांगलीसह चार जिल्ह्यांत साकारतेय पुस्तकांचे गाव

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : वाचनसंस्कृती रुजावी यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या पुस्तकांचे गाव या योजनेचा विस्तार होत आहे. सातारा जिल्ह्यातील भिलारनंतर राज्यातल्या चार महसुली विभागात पुस्तकांचे गाव आकार घेत आहे. सांगली, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील गावांमध्ये पुस्तकांचे गाव साकारण्यासाठी पुस्तक खरेदी अंतिम टप्प्यात आहे. पुस्तकांच्या गावांसाठी शासनाने सुमारे दोन कोटींची तरतूद केली आहे. … The post सांगलीसह चार जिल्ह्यांत साकारतेय पुस्तकांचे गाव appeared first on पुढारी.

सांगलीसह चार जिल्ह्यांत साकारतेय पुस्तकांचे गाव

ठाणे; Bharat Live News Media वृत्तसेवा : वाचनसंस्कृती रुजावी यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या पुस्तकांचे गाव या योजनेचा विस्तार होत आहे. सातारा जिल्ह्यातील भिलारनंतर राज्यातल्या चार महसुली विभागात पुस्तकांचे गाव आकार घेत आहे. सांगली, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील गावांमध्ये पुस्तकांचे गाव साकारण्यासाठी पुस्तक खरेदी अंतिम टप्प्यात आहे. पुस्तकांच्या गावांसाठी शासनाने सुमारे दोन कोटींची तरतूद केली आहे.
सांगली जिल्ह्यातील अंकलखोप, छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यातील वेरूळ, गोंदियातील नवेगाव बांध, सिंधुदुर्गमधील पोंभुर्ले (ता. देवगड) या गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. वाचकांना दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेने तज्ज्ञांची समिती नियुक्त केली आहे. या समितीत श्यामसुंदर जोशी, अविनाश कोल्हे, रेखा दिघे आदींचा समावेश आहे.
Latest Marathi News सांगलीसह चार जिल्ह्यांत साकारतेय पुस्तकांचे गाव Brought to You By : Bharat Live News Media.