
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ या पक्षाला तुतारी हे निवडणूक चिन्ह मिळाले. निवडणूक आयोगाने हे चिन्ह देण्यासंदर्भात आदेश काढले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत आता येणाऱ्या निवडणुकीत शरद पवार गटाला आता हे चिन्ह वारण्याचे आदेश देण्यात आले आहे. ‘तुतारी’ पक्ष चिन्ह मिळल्यानंतर पवार गटाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी पोस्ट करत म्हटलं आहे की, ” महाराष्ट्रात रयतेचे राज्य आणण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.” (NCPSP)
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष दोघांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे देण्यात आला. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या वतीने शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ हे नाव देण्यात आले होते. त्यानंतर शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि पक्ष चिन्हावर ताबा कुणाचा यावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ हे नाव वापरू देण्याची मागणी शरद पवार गटाने केली होती. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाला सदर नाव वापरू द्यावे आणि एक आठवड्याच्या आत शरद पवार गटाला उपलब्ध चिन्हांपैकी चिन्ह देण्यात यावे, असे निर्देश निवडणूक आयोगाला दिले होते. या निर्देशांचे पालन करत निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला ‘तुतारी’ हे निवडणूक चिन्ह दिले आहे. शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’च्या वतीने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात या चिन्हाची प्रसिद्धी करण्यात येत आहे.
रयतेचे राज्य आणण्यासाठी आम्ही सज्ज : सुप्रिया सुळे
‘तुतारी’ चिन्ह मिळाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी कवी केशवसूत यांची कविता शेअर करत आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे,
“नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार या आपल्या पक्षाला ‘तुतारी फुंकणारा माणूस’ हे चिन्ह निवडणूक आयोगाने बहाल केले आहे. हि तुतारी अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचा संदेश देते. महाराष्ट्राला झुकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘महाराष्ट्रद्रोही’ प्रवृत्ती, तरुणांचे रोजगार शेजारच्या राज्याच्या झोळीत अलगद नेऊन टाकणारे आणि राज्याचा सामाजिक सलोखा ढळावा यासाठी सतत काम करणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात संघर्ष करण्याची हाक ही तुतारी देते. मायबाप जनतेची सेवा, कष्टकरी शेतकरी आणि महिलांचा सन्मान व महाराष्ट्राचा स्वाभिमान या त्रिसूत्रीचा अवलंब करुन महाराष्ट्रात रयतेचे राज्य आणण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. कविवर्य केशवसुत म्हणतात त्याप्रमाणे – ‘हल्ला करण्या ह्या दंभावर, ह्या बंडावर शुरांनो! या त्वरा करा रे! समतेचा ध्वज उंच धरा रे! नीतीची द्वाही पसरा रे! तुतारीच्या ह्या सुराबरोबर’ सावध ऐका पुढल्या हाका, खांद्यास चला खांदा भिडऊनी!”
NCPSP : ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पुढील प्रमाणे लक्षवेधी पोस्ट करण्यात आली: “महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्याने ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणे ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी खा. शरदचंद्र पवार यांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!”
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार या आपल्या पक्षाला ‘तुतारी फुंकणारा माणूस’ हे चिन्ह निवडणूक आयोगाने बहाल केले आहे. हि तुतारी अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचा संदेश देते. महाराष्ट्राला झुकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘महाराष्ट्रद्रोही’ प्रवृत्ती, तरुणांचे रोजगार शेजारच्या… pic.twitter.com/k9cqhTj6RP
— Supriya Sule (@supriya_sule) February 23, 2024
हेही वाचा
Intuitive Machines | ५० वर्षांनंतर अमेरिकेचे खासगी मून लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरले
Manohar Joshi Passed Away : महाराष्ट्र एका सुसंस्कृत, व्यासंगी नेत्याला मुकला; मुख्यमंत्री शिंदेंनी मनोहर जोशींना वाहिली श्रद्धांजली
ठाणे : गोएंका शाळेतील विद्यार्थ्यांसोबत सहलीदरम्यान विनयभंग; पालकांचे शाळेसमोर आंदोलन, तीन शिक्षकांसह कर्मचारी निलंबित
Latest Marathi News सावध ऐका पुढल्या हाका; ‘तुतारी’ चिन्हावर सुप्रिया सुळेंची पोस्ट चर्चेत Brought to You By : Bharat Live News Media.
