कोट्यवधींचे ड्रग्ज; सांगली हादरली!

सांगली : इस्लामपूर आणि सांगलीपासून अवघ्या पाच किलोमीटरवर कुपवाड शहरात एमडी ड्रग्ज प्रकरण उघडकीस आले. महापालिकेचे वार्षिक ‘बजेट’ही नसेल, एवढे कोट्यवधींचे ‘एमडी’ ड्रग्ज सापडले. या कारवाईने सांगली शहरासह जिल्हा हादरला आहे! राजकीय, ‘खाकी’तील शुक्राचार्य! मुख्य तस्कर आयुब मकानदार (वय 44, रा. बाळकृष्णनगर, कुपवाड) याच्यासह तिघांना अटक केली आहे. या मोठ्या ड्रग्ज प्रकरणात फक्त तिघेच सहभागी … The post कोट्यवधींचे ड्रग्ज; सांगली हादरली! appeared first on पुढारी.

कोट्यवधींचे ड्रग्ज; सांगली हादरली!

सचिन लाड

सांगली : इस्लामपूर आणि सांगलीपासून अवघ्या पाच किलोमीटरवर कुपवाड शहरात एमडी ड्रग्ज प्रकरण उघडकीस आले. महापालिकेचे वार्षिक ‘बजेट’ही नसेल, एवढे कोट्यवधींचे ‘एमडी’ ड्रग्ज सापडले. या कारवाईने सांगली शहरासह जिल्हा हादरला आहे!
राजकीय, ‘खाकी’तील शुक्राचार्य!
मुख्य तस्कर आयुब मकानदार (वय 44, रा. बाळकृष्णनगर, कुपवाड) याच्यासह तिघांना अटक केली आहे. या मोठ्या ड्रग्ज प्रकरणात फक्त तिघेच सहभागी असतील, ही कोणालाही न पटणारी व खरे न वाटणारी गोष्ट. यामागे राजकीय आणि पोलिस खात्यातील काही झारीतील शुक्राचार्य असल्याशिवाय मकानदार इतके मोठे धाडस करणार नाही.
‘हप्ता’ नावाचा रोग!
पुण्यातून सुरू झालेल्या एमडी ड्रग्जचा प्रवास महाराष्ट्रासह गोवा व कर्नाटकातही सुरू आहे. ड्रग्ज प्रकरणात
सांगलीचे नाव महाराष्ट्रातच नव्हे, तर अन्य देशांमध्येही अग्रस्थानी पोहोचले असावे, याबद्दल आता दुमत राहिले नाही.
कुपवाड पोलिस करीत काय होते?
आयुब यापूर्वी इस्लामपुरात सापडलेल्या ड्रग्ज प्रकरणात आठ वर्षे शिक्षा भोगून आला. वास्तविक तो सध्या काय करतो? त्याच्या उत्पनाचे साधन काय? तो कोणा-कोणाच्या संपर्कात असतो? त्याची कुठे उठ-बस असते? यावर कुपवाड पोलिसांनी ‘वॉच’ ठेवायला हवा होता. त्याचा हा धंदा इतके दिवस राजरोसपणे आरामशीर सुरू असताना कुपवाड पोलिस नेमके काय करीत होते? ‘हप्ता’ नावाचा रोग अनेकांना जडलेला असतो. त्याचा हा परिणाम असावा, अशी चर्चा आहे.
‘एमडी’ रासायनिक पदार्थ
‘एमडी’ ड्रग्ज हा रासायनिक पदार्थ आहे. पांढर्‍या किंवा पिवळसर रंगाच्या भुकटीच्या तसेच कॅप्सूलच्या स्वरूपात तो वितरित होतो. त्यामुळे तो तोंडावाटे गिळून खाता येतो अथवा नाकातून ओढता येतो.
‘म्याव-म्याव’ ड्रग्ज
राज्यातील तसेच बाहेरील गोवा व कर्नाटक राज्यात ‘एमडी’ ड्रग्जला मोठी मागणी आहे. सहज आणि स्वस्त उपलब्ध होत असल्याने एमडीची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. याचे सेवन केल्याने डोळे मांजरासारखे बारीक होतात. त्यामुळे त्याला ‘म्याव-म्याव’ असे म्हटले जाते.
कुपवाड पोलिसांना कसे माहीत नाही?
कुपवाडमधून सुरू असलेल्या या गोरखधंद्याची कल्पना कुपवाड पोलिसांना कशी काय नव्हती? पुण्याचे पोलिस येथे येऊन कारवाई करीत कोट्यवधींचे एमडी ड्रग्ज पकडतात आणि याची खबर सांगलीतील पोलिसांना नसावी, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
Latest Marathi News कोट्यवधींचे ड्रग्ज; सांगली हादरली! Brought to You By : Bharat Live News Media.