दु्र्दैवी : दहाव्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : नियोजित बिल्डिंगचे बांधकाम करताना दहाव्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना फुरसुंगी भागात घडली. कामगाराच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी बांधकाम कॉन्ट्रॅक्टर आणि सेंट्रिंग ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे. ज्ञानबाबू लग्नालाल प्रजापती (वय 44, रा. ग्रीन पार्क फेज 1, फुरसुंगी) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा चुलत भाऊ पुत्तनलाल प्रजापती (वय 32, रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 20 फेब्रुवारी रोजी सकाळी पावणेनऊच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरमधील ग्रीन पार्क फेज 1 मध्ये बांधकाम साईटचे काम सुरू आहे. ज्ञानबाबू लग्नालाल प्रजापती दहाव्या मजल्यावर डक्टचे काम काम करताना खाली पडून त्यांचा मृत्यू झाला. ग्रीन पार्कमध्ये सुरू असलेल्या बांधकाम साईटवर कामगारांच्या जीविताच्या दृष्टिकोनातून हेल्मेट, सुरक्षित जाळी, सेफ्टी बेल्ट आदी साधनसामग्री पुरविण्यात आली नव्हती. निष्काळजीपणा केल्याने कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पवार करत आहेत.
हेही वाचा
अधिकारी, ’माननीय’ तुपाशी; सामान्य मात्र उपाशी
मविआतील जागावाटपाचा निर्णय आठवडाभरात होणार
Onion Export News | ५४ हजार टन कांदा निर्यातीस परवानगी
Latest Marathi News दु्र्दैवी : दहाव्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.
