पुरावे सिद्ध; जास्तीत जास्त शिक्षा द्या : डॉ. दाभोलकर कुटुंबीयांची मागणी

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खुनातील आरोपींच्या विरोधात पुरावे सिद्ध झालेले आहेत. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी डॉ. दाभोलकर यांच्या कुटुंबीयांनी न्यायालयाकडे केली आहे. याबाबतचे लेखी म्हणणे अॅड. ओंकार नेवगी यांनी गुरुवारी (दि. 22) विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सादर केले. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) वकिलांचा अंतिम युक्तिवाद संपल्यानंतर डॉ. दाभोलकर कुटुंबीयांच्या वतीने न्यायालयात लेखी म्हणणे सादर करण्यात आले.
मानसशास्त्रीय मूल्यांकन करण्याच्या पुराव्यालादेखील मूल्य आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने 2023 साली दिलेल्या एका निकालात नमूद आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींचे मानसशास्त्रीय मूल्यांकन विचारात घेतले पाहिजे, अशी मागणीदेखील अर्जात करण्यात आली आहे.
एक मार्चला बचाव पक्षाच्या वतीने अंतिम युक्तिवाद सुरू होणार आहे. त्यापूर्वी आम्ही दोन महत्त्वपूर्ण न्यायनिवाड्याचे दाखले देणार आहोत, असेही अॅड. नेवगी यांनी सांगितले.
खून करण्यामागचा उद्देश काय होता?
डॉ. दाभोलकर यांचा खून करण्यामागचा उद्देश काय होता? डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणार्या आरोपींना दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी छायाचित्रासह न्यायालयात ओळखले आहे. तसेच डॉ. दाभोलकर यांचे शवविच्छेदन करणारे ससूनचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनी सर्व माहिती न्यायालयात सांगितली आहे. आरोपी अंदुरे याने गुन्हा केल्याचा कबुली जबाब अतिरिक्त न्यायालयात दिला आहे. या सर्वांच्या आधारे आरोपींविरुद्ध अनेक पुरावे सिद्ध झाले आहेत, असे या अर्जात नमूद आहे.
हेही वाचा
विराट कोहली- बापमाणूस..!
भारतीय विद्यार्थिनीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसाला शिक्षा नाहीच
राधानगरी येथे अपघात : एका भावाचा मृत्यू, दुसरा अत्यवस्थ
Latest Marathi News पुरावे सिद्ध; जास्तीत जास्त शिक्षा द्या : डॉ. दाभोलकर कुटुंबीयांची मागणी Brought to You By : Bharat Live News Media.
