जगातील सर्वात उंच अभिनेत्री!

जगातील सर्वात उंच अभिनेत्री!

कॅलिफोर्निया : अमेरिकेतील वॉलनट क्रीक येथे राहणारी 36 वर्षीय लिंडसे हेडवर्डची उंची जे पाहतात, ते अक्षरश: विस्मयचकित होऊन जातात. स्टार न्यूज वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, या अभिनेत्रीची उंची 6 फूट 8 इंच इतकी अविश्वसनीय आहे आणि 2013 मध्ये गिनीज रेकॉर्डने तिचा जगातील सर्वात उंच अभिनेत्री म्हणून पुरस्कारही प्रदान केला आहे.
आता जे आधीच बुटके असतात, त्यांना चमत्काराची अपेक्षा असते आणि रातोरात आपली उंची वाढावी, असे त्यांना वाटत असते. पण, प्रत्यक्षात असे कधीच होत नसते. मात्र, जे लोक आधीच उंच असतात, त्यांना कशा अडचणींना सामोरे जावे लागते, हे लिंडसेच्या उदाहरणावरून सुस्पष्ट होते.
2013 मध्ये गिनिज रेकॉर्डकडून दखल घेण्यात आलेल्या लिंडसेने कुस्तीत नशीब आजमावले. कुस्तीत तिने आईसिस द अमेझिंग या रिंग नावाने सुरुवात केली. डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये तिने आपली जागा निर्माण केली. सर्वात उंच अभिनेत्री अशीही कालांतराने तिची दखल घेण्यात आली. पण, यानंतरही तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आपल्या साईजचे कपडे, बूट, सँडल्स मिळत नाहीत. इतकेच नव्हे तर त्यांच्या उंचीला अनुरूप असा आयुष्याचा जोडीदार देखील लाभत नाही, ही वस्तुस्थिती लिंडसे मांडते.
आपल्याला पाहणारा प्रत्येक जण उंची किती हा एकच प्रश्न विचारतो आणि त्याला उत्तरे देताना मी हैराण होऊन जाते, असे ती म्हणते. अनेक जण तिला बास्केटबॉल खेळण्याचा अनाहूत सल्ला देऊन जातात. याही पेक्षा आणखी त्रासदायक बाब म्हणजे, तिला जे कपडे आवडतात, ते तिला बसत नाहीत आणि ती ते परिधान करूच शकत नाही. ग्रे अ‍ॅनॉटॉमी, डब्ल्यूडब्ल्यू नेक्स्ट, आर100, द इंटर्नशिप गेम्समध्ये ती यापूर्वी दिसून आली आहे.
The post जगातील सर्वात उंच अभिनेत्री! appeared first on पुढारी.

कॅलिफोर्निया : अमेरिकेतील वॉलनट क्रीक येथे राहणारी 36 वर्षीय लिंडसे हेडवर्डची उंची जे पाहतात, ते अक्षरश: विस्मयचकित होऊन जातात. स्टार न्यूज वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, या अभिनेत्रीची उंची 6 फूट 8 इंच इतकी अविश्वसनीय आहे आणि 2013 मध्ये गिनीज रेकॉर्डने तिचा जगातील सर्वात उंच अभिनेत्री म्हणून पुरस्कारही प्रदान केला आहे. आता जे आधीच बुटके असतात, त्यांना …

The post जगातील सर्वात उंच अभिनेत्री! appeared first on पुढारी.

Go to Source