हरहुन्नरी अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र सरकार का सर्वोच्च नागरिक ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार आज गुरुवार, दि. २२ रोजी दिग्गज मराठी अभिनेते अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आला. (Ashok Saraf) कला क्षेत्रातील योगदानासाठी अशोक सराफ यांना २०२३ साठीचा हा पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. (Ashok Saraf) मोठा पडद्यावर मराठी चित्रपटांचा धुमाकूळ अनेक … The post हरहुन्नरी अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान appeared first on पुढारी.

हरहुन्नरी अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र सरकार का सर्वोच्च नागरिक ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार आज गुरुवार, दि. २२ रोजी दिग्गज मराठी अभिनेते अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आला. (Ashok Saraf) कला क्षेत्रातील योगदानासाठी अशोक सराफ यांना २०२३ साठीचा हा पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. (Ashok Saraf)
मोठा पडद्यावर मराठी चित्रपटांचा धुमाकूळ
अनेक दिग्गज अभिनेत्यांपैकी एक अशोक सराफ आहेत. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयांनी सर्वांच्या मनावर रुंजी घातली. रितेश देशमुखच्या वेड या चित्रपटातीलही त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. रिपोर्टनुसार, आता ते ‘शेंटिमेंटल’मध्ये दिसणार आहे. चित्रपटांशिवाय त्यांनी अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे. हम पाच, डोंट वरी हो जाएगा यासारख्या मालिकांमध्ये त्यांनी प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावलं.
अशोक सराफ ७६ वर्षांचे आहेत. तरीही, ते जणू तरूण अभिनेता असल्याचा भास आपल्याला आजही होतो. आपल्या वयापेक्षाही कमी अभिनेत्रींसोबत अभिनय करणे आणि त्या-त्या भूमिकेत परफेक्ट बसण्याचे कौशल्य फक्त त्यांच्याकडेच आहे, असे म्हणायला हरकत नाही. छोट्या पडद्यावर येण्यापूर्वी रंगभूमीवरील त्यांचं सादरीकरण ‘अफलातून’च आहे. तर संगीत नाटकातीलही त्यांच्या भूमिकांचे कौतुक करावं लागेल. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांचे रंगभूमीवर सादरीकरण केले. वि. वा. शिरवाडकरांच्या ‘ययाती आणि देवयानी’ची कथेच्या सादराकरणात अशोक सराफ एक प्रतिभावंत कलावंत म्हणून उतरले. ययाती आणि देवयानी नाटकात त्यांनी विदूषकाची भूमिका साकारली होती.
मोठा पडदा गाजवला 
अशोक यांनी १९६९ मध्ये जानकी चित्रपटातून सिनेसृष्टीत प्रवेश केला. सुरूवातीला निळू फुलेंच्याबरोबर त्यांची चांगली जोडी जमली. ‘फटाकडी’, ‘मोसंबी नारंगी’, ‘गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं’, ‘सासुरवाशीन’, ‘बिन कामाचा नवरा’, ‘कळत नकळत’, ‘माझा पती करोडपती’ यांसारख्या चित्रपटांमध्ये निळू आणि अशोक यांच्या जोडीने धमाल उडवून दिली.
अशोक सराफ यांनी अडीचशेहून अधिक चित्रपट गाजवले. ‘दोन्ही घरचा पाहुणा’, ‘जवळ ये लाजू नको,’ ‘तुमचं आमचं जमलं,’ ‘दिड शहाणे’, ‘हळदी कुंकू’, ‘दुनिया करी सलाम’, ‘पांडू हवालदार’, ‘कळत नकळत’, ‘भस्म’, ‘वजीर’, ‘चौकट राजा’, ‘अशी ही बनवा बनवी,’ ‘गोंधळात गोंधळ,’ ‘बिन कामाचा नवरा,’ ‘लपंडाव,’ ‘एक डाव भुताचा,’ ‘आम्ही सातपुते’ यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी आपली वेगळी ओळख बनवली. ‘नवरी मिळे नवऱ्याला’,’ आत्मविश्वास’, ‘गंमत जंमत’, ‘आयत्या घरात घरोबा’पासून, ‘शुभमंगल सावधान’, ‘आई नंबर वन’ व ‘एक शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर’ यांसारख्या चित्रपटांसून वेगळ्या भूमिका त्यांनी साकारल्या.
हिंदी चित्रपटसृष्टीतील आठवणीतील भूमिका
अशोक यांनी मराठी चित्रपटांबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. ‘करण-अर्जुन’, ‘येस बॉस’, ‘प्यार किया तो डरना क्या,’ ‘गुप्त,’ ‘कोयला,’ ‘जोरू का गुलाम,’ ‘सिंघम’ यांसारख्या हिंदी चित्रपटांतूनही त्यांनी विविध भूमिका साकारल्या. राकेश रोशन यांचा १९९५ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘करण अर्जुन’मध्ये अशोक यांनी ‘मुन्शीजी’ची भूमिका साकारली. त्यांची ही भूमिका आजही सिनेप्रेमींच्या आजही लक्षात आहे. तर ‘येस बॉस’मध्ये शाहरूख खानच्या मित्राची भूमिका त्यांनी साकारल्या. ‘सिंघम’मध्ये अजय देवगनसोबत एका पोलिस कॉन्स्टेबलची भूमिका करून त्यांनी अजयसोबतच आपलीदेखील प्रतिमा पुन्हा एकदा उंचावली.

 
 
Latest Marathi News हरहुन्नरी अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान Brought to You By : Bharat Live News Media.