Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाला तुतारी हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिल्याची माहिती संमोर आली आहे. आगामी लोकसभा निवडणूक शरद पवार गट कोणत्या चिन्हावर लढणार अशी चर्चा होती. आज निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर ही मोठी अपडेट समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि घड्याळ चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) यांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने (EC) ६ फेब्रुवारी रोजी दिला होता. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शरद पवार (Sharad Pawar) गटाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हे नाव मिळाले होते. आज त्यांच्या चिन्हावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले आहे. तुतारी हे शरद पवार गटाचं नवीन चिन्ह असणार आहे असा निर्णय निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे. या निर्णयानंतर शरद पवार गटाची आगामी निवडणूकीसाठी निर्माण झालेला पेच दूर झाला आहे.
“एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी!”
“महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह… pic.twitter.com/LsgvjlWzuN
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 22, 2024
Latest Marathi News मोठी बातमी! ‘तुतारी’ हे शरद पवार गटाचं नवं चिन्ह; निवडणूक आयोगाचा निर्णय Brought to You By : Bharat Live News Media.