रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’ चा ट्रेलर ‘या’ दिवशी भेटीला

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. रणबीरने या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणतीही कसून सोडलेली नाही. ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचे पोस्टर, धमाकेदार टीझर आणि गाणी याआधीच रिलीज झाली आहेत. गाणी रिलीज झाल्यानंतर चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट १ डिसेंबर रोजी म्हणजे, अगदी आठवड्याभराचा अवधीत प्रदर्शित होणार आहे. … The post रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’ चा ट्रेलर ‘या’ दिवशी भेटीला appeared first on पुढारी.
रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’ चा ट्रेलर ‘या’ दिवशी भेटीला


पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. रणबीरने या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणतीही कसून सोडलेली नाही. ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचे पोस्टर, धमाकेदार टीझर आणि गाणी याआधीच रिलीज झाली आहेत. गाणी रिलीज झाल्यानंतर चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट १ डिसेंबर रोजी म्हणजे, अगदी आठवड्याभराचा अवधीत प्रदर्शित होणार आहे. दरम्यान या चित्रपटाचा ट्रेलर ( Animal Trailer ) चाहते प्रतिक्षा करत होते. आता चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार असून निर्मात्यांनी त्याची तारीख जाहीर केली आहे.
संबंधित बातम्या 

IFFI : इफ्फी उद्घाटन सोहळ्यात पंकज त्रिपाठीच्या ‘कडक सिंग’चा ट्रेलर रिलीज
समसारा चित्रपट : सायली संजीव, ऋषी सक्सेना पुन्हा एकदा एकत्र
HBD Neha Sharma : वडील आमदार; पण बोल्ड नेहाचा बॉलिवूडमध्ये तडका

दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर करत आगामी ‘अॅनिमल’ च्या ट्रेलर ( Animal Trailer ) रिलीज डेटची घोषणा केली आहे. हा फोटो ब्लॅक ॲन्ड व्हाईट असून यात संदीप रेड्डी हे रणबीर कपूरसोबत दिसत आहे. २३ नोव्हेंबर २०२३ ला ‘अ‍ॅनिमल’ चा ट्रेलर रिलीज होणार असल्याचे सांगितले आहे. यावरून चित्रपट रिलीज होण्यासाठी ट्रेलर चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. यामुळे त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
‘अॅनिमल’ मध्ये रणबीर कपूरसोबत साऊथ स्टार रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, अनिल कपूर आणि तृप्ती डिमरी दिसणार आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांची जोडी पहिल्यांदा स्क्रिन शेअर करणार आहे. ‘अ‍ॅनिमल’ हा एक रक्तरंजित गँगस्टर ड्रामा चित्रपट आहे, ज्याची कथा वडील आणि मुलाच्या आंबट नात्याभोवती फिरणार आहे.
भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांच्या टी-सिरीज, मुराद खेतानी यांचा सिने स्टुडिओ आणि प्रणय रेड्डी वांगा यांच्या भद्रकाली पिक्चर्सने याची निर्मिती केली आहे. तर संदीप रेड्डी वांगा यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट १ डिसेंबरला हिंदी, तमिळ, तेलुगु आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विकी कौशलच्या ‘सॅम बहादूर’ चित्रपटाशी टक्कर देणार आहे. या चित्रपटात विकीसोबत सान्या मल्होत्रा ​​आणि फातिमा सना शेख दिसणार आहेत.

 

View this post on Instagram

 
A post shared by Sandeep Reddy Vanga (@sandeepreddy.vanga)

The post रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’ चा ट्रेलर ‘या’ दिवशी भेटीला appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. रणबीरने या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणतीही कसून सोडलेली नाही. ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचे पोस्टर, धमाकेदार टीझर आणि गाणी याआधीच रिलीज झाली आहेत. गाणी रिलीज झाल्यानंतर चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट १ डिसेंबर रोजी म्हणजे, अगदी आठवड्याभराचा अवधीत प्रदर्शित होणार आहे. …

The post रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’ चा ट्रेलर ‘या’ दिवशी भेटीला appeared first on पुढारी.

Go to Source