जळगाव : जिल्ह्यातील पाणीदार तालुके सोडून सर्व तालुक्यातील पाणी टंचाई /चाऱ्याचे आराखडे तयार करावेत. तसेच निवडणुकीपूर्वी रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी यांच्या प्रलंबित आधारलिंकची कामे, पेन्शन आपल्या दारी याची कामे, पी. एम. किसान ईकेवायसी, कामगार कल्याणची भांडी वाटप योजना ही कामे प्राधान्याने पूर्ण करावीत असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.
जिल्ह्यातील महसूल विभाग अधिकाऱ्यांच्या ग्रंथालय भवन येथे घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, सर्व उपजिल्हाधिकारी, उप विभागीयअधिकारी, तहसीलदार उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या कामाची पूर्व तयारी बरोबर महसूलची महत्वाची कामं रेंगाळता कामा नयेत. त्या कामाची प्राथमिकता लक्षात घेवून ही कामं विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी सर्व महसूल यंत्रणांना दिल्या.
हेही वाचा :
शिवाजी विद्यापीठाच्या खानापुरातील उपकेंद्रासाठी १०० कोटींच्या तरतूदीचे उपमुख्यमंत्र्यांकडून आदेश : वैभव पाटील
Prasad Jawade : लग्नानंतर बायकोचा पायगुण कमाल; प्रसाद जवादेने अमृताचे केले कौतुक
Latest Marathi News जळगाव : आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना Brought to You By : Bharat Live News Media.