लातूर : देवणीत पुन्हा एक अल्पवयीन मुलीचा विनयभंग

देवणी; पुढारी वृत्तसेवा : जानेवारी महिन्यात देवणी तालुक्यातील दोन घटनेनंतर देवणी येथे एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रकार घडल्याने विनयभंगाची मालिका कधी थांबणार अशी चर्चा सुरू आहे. विनयभंग प्रकरणी आरोपींविरोधात देवणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवणी येथे मंगळवारी (दि. २०) मध्यरात्री आरोपी सोहेल मिर्झा … The post लातूर : देवणीत पुन्हा एक अल्पवयीन मुलीचा विनयभंग appeared first on पुढारी.

लातूर : देवणीत पुन्हा एक अल्पवयीन मुलीचा विनयभंग

देवणी; Bharat Live News Media वृत्तसेवा : जानेवारी महिन्यात देवणी तालुक्यातील दोन घटनेनंतर देवणी येथे एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रकार घडल्याने विनयभंगाची मालिका कधी थांबणार अशी चर्चा सुरू आहे. विनयभंग प्रकरणी आरोपींविरोधात देवणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवणी येथे मंगळवारी (दि. २०) मध्यरात्री आरोपी सोहेल मिर्झा (रा. देवणी) याने फिर्यादीच्या घरी जाऊन ती अल्पवयीन असल्याचे माहित असूनही तिचा वाईट हेतूने हात धरून विनयभंग केला असल्याची फिर्याद पिडिताने दिली. या फिर्यादीनंतर आरोपी विरोधात आज (दि.२२) दुपारी भादवि ३५४ ब व कलम ८ आणि १७ पोक्सो कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक एम.ए डोके हे करीत आहेत. गेल्या एक महिन्यात तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याची ही तिसरी घटना आहे.
Latest Marathi News लातूर : देवणीत पुन्हा एक अल्पवयीन मुलीचा विनयभंग Brought to You By : Bharat Live News Media.