घोटीत ९५ हजारांचा गांजा जप्त, संशयितांना अटक

घोटी : मुंबई-नाशिक मार्गावर मिळालेल्या माहितीनुसार व वर्णनानुसार पोलीस निरीक्षक विनोद पाटील व घोटी पोलिसांनी सूत्रबद्ध नियोजन करत एकूण ९५ हजार किंमतीचा गांजा मुद्देमालासह आरोपींना पकडण्यात यश आले आहे.
घोटी पोलिसांनी संशयित आरोपींना मुद्देमालासह अटक केली. मुंबई-नाशिक मार्गावर टोल पारी ५ वाजेच्या सुमारास एका हॉटेल जवळ ३० हजार रुपये किमतीची मोरपंखी रंगाची टीव्हीएस कंपनीची ज्युपिटर स्कुटी क्रमांक एमएच १५ एच एक्स ७६९२ वापरता जुनी वापरत्या वाहनात संशयित आरोपी प्रतीक संजय सोनवणे वय २४ रा. कुशेगाव , अजय विलास गांगुर्डे वय २३ राहणार कुशेगाव, दीपक शिवराम सोनवणे वय २२ राहणार कुशेगाव याना शिताफीने छापा टाकून जागे वरच पकडण्यात आले . पोलिसांनी जवळ येत वाहनाची तपासणी केली. वाहनात प्लास्टिक पान मसाल्याच्या पिशवीतून १० किलो गांजा,वाहन,मोबाईल , सिम कार्ड असा एकूण ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल व संशयित आरोपींना अटक करण्यात आली.
हेही वाचा :
Crime News : शिरपूर मार्गावर पिकअपमधून साडेचार लाखांचा गुटखा जप्त
IPL 2024 Schedule Announcement : आयपीएलचे वेळापत्रक जाहीर! सीएसके विरुद्ध आरसीबी यांच्यात पहिली लढत
Latest Marathi News घोटीत ९५ हजारांचा गांजा जप्त, संशयितांना अटक Brought to You By : Bharat Live News Media.
