शिरपूर मार्गावर पिकअपमधून साडेचार लाखांचा गुटखा जप्त

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा- मध्य प्रदेशमधून धुळ्याकडे जाणाऱ्या शिरपूर रोडवर एका पिकअपमधून साडेचार लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी व गुटख्यासह बोलेरो पिकअप मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमधून किराणा सामानासह एका पिकअप वाहनातून धुळ्याकडे जाणाऱ्या शिरपूर रस्त्यावरून गुटख्याची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाली. या माहितीआधारे 21 च्या मध्यरात्री सेंदवाकडून धुळेकडे जाणाऱ्या चोपडा-शिरपूर रोडवरील हातेड फाटा येथे पोलिसांनी सापळा रचत पिकअप थांबवत तपासणी केली. त्यात साडेचार लाख रुपयांचा गुटखा आढळला. पोलिसांनी तो जप्त करत प्रशांत मानिको भिल (रा. हेकंयवाडी-धुळे) याला अटक केली आहे.
हेही वाचा :
Shaitaan Trailer : ‘शैतान’ ट्रेलर लॉन्चला अजय देवगन-ज्योतिकाचा बॉसी लूक
Lok Sabha Election 2024 : ‘प्रो-इन्कम्बन्सी’ : सत्ता अबाधित ठेवण्यासाठी ‘हे’ घटक ठरतात प्रभावी
जळगाव : जिल्हास्तरीय वनहक्क समितीच्या बैठकीत ‘इतके’ वनहक्क दावे मंजूर
Latest Marathi News शिरपूर मार्गावर पिकअपमधून साडेचार लाखांचा गुटखा जप्त Brought to You By : Bharat Live News Media.
