क्रिकेट आणि भारतीय राजकारणातील बदल…एक समांतर प्रवास!
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारतामध्ये इंग्रजी मुळाक्षर ‘सी’ने सुरु होणारे दोन शब्द म्हणजे क्रिकेट ( Cricket) आणि सिनेमा (cinema) यांची माेठी चलती आहे. या दाेन क्षेत्रानंतर राजकारण ( Politics) हा सर्वसामान्यांच्या चर्चेतील आवडीचा विषय. भारतीय क्रिकेटमधील यशोगाथा आणि भारतीय राजकाणातील विरोधकांचा उद्य यांचा एक समांतर प्रवास असल्याचे The Pro-Incumbency Century या पुस्तकातील लेखात म्हटलं आहे. जाणून घेवूया ८० च्या दशकात भारतीय क्रिकेट आणि देशातील राजकीय क्षेत्राच्या समांतर प्रवासाविषयी…
क्रिकेटबराेबरच भारतीय राजकारणातही बदल
७० च्या दशकात भारतीय क्रिकेट संघात दिग्गज फलंदाज आणि फिरकीपटूंचा दबदबा होता. या काळात उत्कृष्ट फिरकीपटूंसाठी भारतीय संघ नावाजलेला होता. अशावेळी वेगवान गोलंदाज म्हणून एक खेळाडू संघात आला. त्याचे नाव होतं कपिल देव. वर्ष होते १९७८. पुढील काही वर्षात त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीसह नेतृत्त्व गुणांनी भारतीय क्रिकेटचा चेहरामोहराच बदलला. १९८३ मध्ये क्रिकेट एकदिवसीय (वन-डे) विश्वचषक स्पर्धा झाल्या. इंग्लंडमध्ये झालेली ही स्पर्धा भारत जिंकेल असे कोणी म्हटलं तरी त्याचे हसू होत असे. कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय क्रिकेट संघ अन्य संघांच्या तुलनेने दुबळा होता. मात्र कपिल देव यांनी संघाची बांधणी केली. संघातील खेळाडूंनीही उत्कृष्ट क्रिकेटचे प्रदर्शन घडवत त्या काळातील बलाढ्य वेस्ट इंडिज संघाचा पराभव करत भारताला विश्वचषक जिंकून दिला. स्वातंत्र्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर जिंकलेली ही पहिलीच स्पर्धा होती. क्रिकेटपटूंनी संपूर्ण देशवासीयांना आपल्या विजयाने संदेश दिला की, आपण जिंकू शकताे. असेच काहीसे भारतीय राजकारणातही झालं.
कपिल देव यांनी क्रिकेटला दिली नवी ओळख, तर विरोधकांनी राजकारण बदलले
७०च्या दशकात आणीबाणीच्या काळात सत्ताधारी काँग्रेसविरोधात विरोधी पक्ष एकवटले. त्या काळात राजकारण म्हटलं की काँग्रेस, इतका या पक्षाचा देशभरात दबदबा होता. जसा क्रिकेटमध्ये दिग्गज फलंदाज आणि फिरकीपटूंचे वलय होते. तसेच काहीसे राजकारणात काँग्रेसची ताकद हाेती. कपिल देव यांनी भारतीय क्रिकेट संघात १९७८ मध्ये प्रवेश केला. यानंतर पुढील पाच वर्षांत त्यांच्या नेतृत्त्वाखालील संघाने विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. असचं काहीसे आणीबाणीनंतर भारतात झाले. विरोधी पक्षांनाही आपण जिंकू शकतो, हा आत्मविश्वस आला. यातूनच भारतात अँटी-इन्कम्बन्सी म्हणजे सत्ताविरोधी वातावरण हा शब्दही रुढ झाला. भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर संघात वेगवान गोलंदाजांची संख्या वाढली. मात्र याचा अर्ध नेहमीच वेगवान गोलंदाजींनच भारताला सामने जिंकून दिले असे नाही. तर फिरकीपटूंचे नंतरही संघातील विजयात मोलाचा वाटा राहिला. त्याचप्रमाणे भारतीय राजकारणात अँटी इन्कम्बन्सी राहिली नाही. तर प्रो-इन्कम्बन्सी म्हणजे सत्ताधार्यांना कौल हेही समीकरण वारंवार दिसले. मात्र निवडणुकीपूर्वी बोलबाला राहिला तो अँटी – इन्कम्बन्सी शब्दाचाच.
हेही वाचा :
Lok Sabha Election 2024 | श्रीमंत नव्हे गरीब मतदार ठरवतात त्यांचा नेता कोण?; जाणून घ्या देशातील मतदानांचा ट्रेंड
Lok Sabha Election 2024 : दिल्लीत आप–कॉंग्रेसचे जागावाटपाचे सूत्र ठरले?
Lok Sabha Election 2024 : ‘प्रो-इन्कम्बन्सी’ : सत्ता अबाधित ठेवण्यासाठी ‘हे’ घटक ठरतात प्रभावी
Latest Marathi News क्रिकेट आणि भारतीय राजकारणातील बदल…एक समांतर प्रवास! Brought to You By : Bharat Live News Media.