खाद्यपदार्थांत आढळलं गोमांस, एकास अटक
देवळाली कॅम्प : Bharat Live News Media वृत्तसेवा- येथील मिठाई स्ट्रीट परिसरात खाद्यपदार्थांमध्ये गोवंशसदृश १२ किलो मांस आढळून आल्याने देवळाली कॅम्प पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे.
मिठाई स्ट्रीटवर गेल्या काही वर्षांपासून मुंबई साबरी दरबार कॅटर्स नावाने मांसाहार विक्री केली जाते. या दुकानात नसीम जफरखान (३०, रा. उत्तर प्रदेश) हा विविध पदार्थांमध्ये गोवंशीय जनावरांचे मांस टाकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रमाकांत सिद्धपुरे, श्याम कोटमे, रामेश्वर जाधव, सुरेश तुपे, विजय कोकणे आदींच्या पथकाने या दुकानात तपासणी केली असता सुमारे १२ किलो वजनाचे २,४०० रुपये किमतीचे गोमांस आढळले. खानविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्यावर अटकेची कारवाई झाली आहे.
हेही वाचा :
Lok Sabha Election 2024 | श्रीमंत नव्हे गरीब मतदार ठरवतात त्यांचा नेता कोण?; जाणून घ्या देशातील मतदानांचा ट्रेंड
The Indrani Mukerjea Story series : इंद्राणी मुखर्जी वेब सीरीजचे स्क्रिनिंग थांबवले
Mumbai News : पालिका एल विभाग कार्यालयासमोर वंचित आघाडीचा रास्ता रोको
Latest Marathi News खाद्यपदार्थांत आढळलं गोमांस, एकास अटक Brought to You By : Bharat Live News Media.