Maratha Reservation : पिंपरी-चिंचवडमध्ये 2 हजार 359 कुणबी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांतील जुनी कागदपत्रे, दस्तऐवज व रजिस्टरमधील नोंदी तपासणीचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 2 हजार 359 मराठा-कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या आहेत. कागदपत्रे व दस्तऐवज तपासणीचे काम येत्या शुक्रवार (दि.24) पर्यंत करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेतील सन 1948 ते 1967 या कालावधीतील दस्तऐवज … The post Maratha Reservation : पिंपरी-चिंचवडमध्ये 2 हजार 359 कुणबी appeared first on पुढारी.

Maratha Reservation : पिंपरी-चिंचवडमध्ये 2 हजार 359 कुणबी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांतील जुनी कागदपत्रे, दस्तऐवज व रजिस्टरमधील नोंदी तपासणीचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 2 हजार 359 मराठा-कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या आहेत. कागदपत्रे व दस्तऐवज तपासणीचे काम येत्या शुक्रवार (दि.24) पर्यंत करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेतील सन 1948 ते 1967 या कालावधीतील दस्तऐवज व कागदपत्रांतील नोंदणी तपासण्यात येत आहेत.
महापालिकेच्या शिक्षण, कर संकलन वैद्यकीय व लेखा विभागांतील या कालावधीतील उपलब्ध दस्तऐवज, कागदपत्रे व नोंदीच्या तपासणीचे काम सुरू आहे. आतापर्यंत वैद्यकीय विभागातील 2 हजार 22 आणि कर संकलन विभागातील 11 हजार 183 कागदपत्रांवरील नोंदी तपासण्यात आल्या. त्यात एकही मराठा-कुणबी नोंद आढळून आलेली नाही.
तर, शिक्षण विभागात सर्वांधिक 5 लाख 83 हजार 832 नोंदी तपासण्यात आल्या. त्यात 2 हजार 359 मराठा-कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या आहेत. त्या संदर्भातील अहवाल दररोज जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्यात येत आहे. ही नोंद तपासणी मोहीम शुक्रवार (दि.24) पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे.
शिक्षण विभागात सर्वाधिक नोंदी
महापालिकेच्या शिक्षण विभागात सर्वांधिक नोंदी आहेत. त्यासाठी महापालिकेच्या प्रत्येक शाळेत मुख्याध्यापक व शिक्षक रजिस्टरमध्ये तपासणी करीत आहेत. आतापर्यंत 5 लाख 83 हजार 832 नोंदी तपासण्यात आल्या आहेत. त्यापैकी 2 हजार 359 कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या आहेत. अद्याप रजिस्टर तपासणीचे काम सुरू आहे, असे शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी सांगितले.
शुक्रवारपर्यंत कागदपत्रे तपासणीची मुदत
राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार महापालिकेतील विविध विभागातील सन 1948 ते 1967 या कालावधीतील कागदपत्रे व नोंदीची तपासणी करण्यात येत आहे. या कालावधीचे काम पूर्ण झाल्यानंतर सन 1948 पूर्वीच्या नोंदी तपासण्यात येणार आहेत. या मोहिमेसाठी शुक्रवार (दि.24) पर्यंतची मुदत संबंधित विभागांना देण्यात आली आहे, असे महापालिकेचे सहायक आयुक्त व नोडल अधिकारी अविनाश शिंदे यांनी सांगितले.
कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी अशा नोंदीची तपासणी
राज्य शासनाने नवा आदेश दिला आहे. त्यात नमूद केले आहेत की, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा अशा जातीच्या नोंदी तपासण्यात याव्यात. त्याचे वरील तीन प्रमाणे वर्गीकरण करावे. तसा स्वतंत्र अहवाल द्यावा. त्यानुसार, महापालिकेच्या संबंधित विभागास सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा
Pune Drugs Case : ड्रग प्रकरणाचा गोपनीय अहवाल न्यायालयात
Dhule Accident : मित्राला हॉस्टेलवर सोडायला गेलेल्या दोघा तरुणांचा अपघाती मृत्यू
Pune News : कल्व्हर्ट, पूल झाले अनधिकृत पार्किंग
The post Maratha Reservation : पिंपरी-चिंचवडमध्ये 2 हजार 359 कुणबी appeared first on पुढारी.

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांतील जुनी कागदपत्रे, दस्तऐवज व रजिस्टरमधील नोंदी तपासणीचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 2 हजार 359 मराठा-कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या आहेत. कागदपत्रे व दस्तऐवज तपासणीचे काम येत्या शुक्रवार (दि.24) पर्यंत करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेतील सन 1948 ते 1967 या कालावधीतील दस्तऐवज …

The post Maratha Reservation : पिंपरी-चिंचवडमध्ये 2 हजार 359 कुणबी appeared first on पुढारी.

Go to Source