भावा विरोधातच बहिणीचा एल्गार; आंध्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्षा पोलिसांच्या ताब्यात

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आंध्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वाय एस शर्मिला रेड्डी यांनी आज (दि.१८) पक्ष कार्यकर्त्यांसह वायएसआरसीपी सरकारच्या विरोधात ‘चलो सचिवालय आंदोलन’ केले. त्यांनी जगन मोहन रेड्डी सरकार लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अयशस्वी ठरल्याचा आरोप केला. दरम्यान, त्यांना पोलिसांनी विजयवाडा येथे ताब्यात घेतले. त्यांना आंध्ररत्न भवनाबाहेर जगमोहन रेड्डी सरकारच्या विरोधात निदर्शने केली. शर्मिला या मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या बहीण आहेत. बुधवारी (दि.२१) पोलिसांच्या नजरकैदेपासून वाचण्यासाठी वायएस शर्मिला यांनी विजयवाडा येथील त्यांच्या पक्ष कार्यालयात रात्र काढण्याचा निर्णय घेतला होता. (YS Sharmila Reddy)
YS Sharmila Reddy : हे सरकार आंदोलनाला घाबरले
माहितीनुसार, वाय एस शर्मिला रेड्डी यांनी विद्यार्थी आणि बेरोजगार यांना येणाऱ्या समस्यांबाबत राज्य सरकारच्या विरोधात ‘चलो सचिवालय’आंदोलन सुरु केले आहे. राज्य सरकारने गेल्या पाच वर्षात या सरकारने विद्यार्थी आणि बेरोजगारांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्यात हे सरकार अपयशी आले आहे. त्यांचे यांचे प्रश्न तातडीने सरकारने सोडवावेत अशी टीका वाय एस शर्मिला रेड्डी केली आहे. माध्यमांशी बोलताना त्या असही म्हणाल्या की, हे सरकार आंदोलनाला घाबरले आहे. पण आम्ही मागे हटणार नाही.
#WATCH | Andhra Pradesh Congress President YS Sharmila Reddy detained by police in Vijayawada. https://t.co/eKE9OWYIzX pic.twitter.com/PcCh1XwSQw
— ANI (@ANI) February 22, 2024
हेही वाचा
The Indrani Mukerjea Story series : इंद्राणी मुखर्जी वेब सीरीजचे स्क्रिनिंग थांबवले
Jarange -Patil vs Baraskar : बारस्करांच्या मागे एक मंत्री, त्याला विकत घेतलंय : जरागेंचा आराेप
HSC Board Exam 2024 : बारावी परीक्षा केंद्रावर तोतया पोलीस बनून बहिणीला कॉपी द्यायला गेला; सॅल्यूट ठोकताच बिंग फुटलं
The post भावा विरोधातच बहिणीचा एल्गार; आंध्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्षा पोलिसांच्या ताब्यात appeared first on Bharat Live News Media.
