दिल्लीत आप–कॉंग्रेसचे जागावाटपाचे सूत्र ठरले?

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीत पंजाबमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या आम आदमी पक्षाने दिल्लीमध्ये कॉंग्रेसोबत आघाडीचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचे सूत्र निश्चित झाले असून लोकसभेच्या दिल्लीतील सात पैकी चार जागांवर आप तर तीन जागांवर कॉंग्रेस लढेल, असे समजते. अर्थात, कॉंग्रेसचा आग्रह आणखी का जागेसाठी आहे तर अन्य राज्यात आम आदमी पक्षाची कॉंग्रेसकडून एका … The post दिल्लीत आप–कॉंग्रेसचे जागावाटपाचे सूत्र ठरले? appeared first on पुढारी.

दिल्लीत आप–कॉंग्रेसचे जागावाटपाचे सूत्र ठरले?

नवी दिल्ली; Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीत पंजाबमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या आम आदमी पक्षाने दिल्लीमध्ये कॉंग्रेसोबत आघाडीचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचे सूत्र निश्चित झाले असून लोकसभेच्या दिल्लीतील सात पैकी चार जागांवर आप तर तीन जागांवर कॉंग्रेस लढेल, असे समजते. अर्थात, कॉंग्रेसचा आग्रह आणखी का जागेसाठी आहे तर अन्य राज्यात आम आदमी पक्षाची कॉंग्रेसकडून एका जागेची मागणी असल्याने यावर सहमतीनंतर औपचारीक आघाडीची घोषणा होईल असे कळते. (Lok Sabha Election 2024)
कॉंग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्षाने दिल्लीत कॉंग्रेसला तीन जागा सोडण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार, पूर्व दिल्ली, ईशान्य दिल्ली आणि चांदनी चौक हे तीन लोकसभा मतदार संघ कॉंग्रेसच्या वाट्याला येऊ शकतात. तर आम आदमी पक्ष नवी दिल्ली, उत्तर पश्चिम दिल्ली, पश्चिम दिल्ली आणि  दक्षिण दिल्ली या चार मतदार संघांमध्ये लढेल, यावर दोन्ही पक्षांची प्राथमिक सहमती झाली आहे. परंतु, महानगर पालिका निवडणुकीतील कॉंग्रेसच्या मतदानाची आकडेवारी आणि मागील विधानसभा निवडणुकीत आपच्या घटलेल्या जागांचा दाखला देत कॉंग्रेसचा आग्रह आणखी एका जागेसाठी आहे. याखेरीज कॉंग्रेसने चंडीगड लोकसभा मतदार संघाची देखील आप कडून मागणी केली होती. तर आम आदमी पक्ष गुजरातमध्ये कॉंग्रेसने दोन ते तीन जागा सोडाव्यात यासाठी आग्रही आहे. यावर दोन्ही पक्षांच्या वाटाघाटी सुरू असल्याने दिल्लीतील आघाडीवर सहमती होऊनही अद्याप औपचारिक शिक्कामोर्तब झाले नसल्याचेही सुत्रांनी सांगितले. (Lok Sabha Election 2024)
सद्यस्थितीत दिल्लीतील लोकसभेच्या सातही जागा भाजपच्या ताब्यात आहेत. २०१९ च्य्या काँग्रेस आणि आप  दोन्ही पक्षांना एकही जागा जिंकता आली नव्हती. मात्र, या निवडणुकीतील काँग्रेसला २३ टक्के मते मिळाली होती, तर आपला १८ टक्के मते मिळाली होती. काँग्रेसने पाच मतदार संघात दुसऱ्या क्रमांकाची तर आपने दोन मतदार संघांमध्ये दुसऱ्या क्रमांची मते घेतली होती. दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढल्यास भाजपला धोबीपछाड देता येईल असा या पक्षांचा होरा आहे.
हेही वाचा

Lok Sabha Election 2024 : ‘प्रो-इन्‍कम्‍बन्‍सी’ : सत्ता अबाधित ठेवण्‍यासाठी ‘हे’ घटक ठरतात प्रभावी
कांदा निर्यातबंदीबाबत अपेक्षाभंग : पारनेर बाजार समितीत आंदोलन
ISRO INSAT-3DS Mission | ‘हवामान’ उपग्रह INSAT-3DS संदर्भात इस्रोची मोठी अपडेट

Latest Marathi News दिल्लीत आप–कॉंग्रेसचे जागावाटपाचे सूत्र ठरले? Brought to You By : Bharat Live News Media.