
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे आणि त्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता झटणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणाऱ्या ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. (Manoj Jarange Patil ) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे या चित्रपटाचे पूर्ण झाले. हा चित्रपट येत्या २६ एप्रिल २०२४ला महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. (Manoj Jarange Patil )
संबंधित बातम्या-
The Indrani Mukerjea Story series : इंद्राणी मुखर्जी वेब सीरीजचे स्क्रिनिंग थांबवले
Amitabh Bachchan – राहुल गांधींनी ऐश्वर्या रायवर वक्तव्य केल्यानंतर अमिताभ यांची महत्त्वाची पोस्ट
महेश मांजरेकर यांच्या ‘ही अनोखी गाठ’ चित्रपटातील ‘सखी माझे देहभान’ गाणे पाहिले का?
चित्रपटाची सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेतर्फे “संघर्षयोद्धा” – मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांची व्यक्तीरेखा अभिनेते रोहन पाटील यांनी साकारली आहे. गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली आहे. सुधीर निकम यांनी पटकथा आणि संवाद लेखन केले आहे. शिवाजी दोलताडे यांचे दिग्दर्शन आहे.
या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर , सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत.
अत्यंत साध्या अशा या कार्यकर्त्याचा जीवनपट आणि आरक्षणासाठीचा संघर्ष समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी “संघर्षयोद्धा” मनोज जरांगे-पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.
Latest Marathi News ‘संघर्षयोद्धा’ – मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण Brought to You By : Bharat Live News Media.
