राहुल गांधींनी ऐश्वर्या रायवर वक्तव्य केल्यानंतर अमिताभ यांची पोस्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या ‘भारत जोडो न्याय यात्रा’ विषयावरून खूप चर्चेत आहेत. नुकताच वाराणसीमध्ये एका रॅलीच्या दरम्यान कार्यकर्त्यांना संबोधित करताना बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि त्यांची सून अभिनेत्री ऐश्वर्या राय विषयी असे काही स्टेटमेंट केलं की, सोशल मीडियावर राहुल गांधींना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. राहुल … The post राहुल गांधींनी ऐश्वर्या रायवर वक्तव्य केल्यानंतर अमिताभ यांची पोस्ट appeared first on पुढारी.

राहुल गांधींनी ऐश्वर्या रायवर वक्तव्य केल्यानंतर अमिताभ यांची पोस्ट

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या ‘भारत जोडो न्याय यात्रा’ विषयावरून खूप चर्चेत आहेत. नुकताच वाराणसीमध्ये एका रॅलीच्या दरम्यान कार्यकर्त्यांना संबोधित करताना बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि त्यांची सून अभिनेत्री ऐश्वर्या राय विषयी असे काही स्टेटमेंट केलं की, सोशल मीडियावर राहुल गांधींना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. राहुल गांधी यांच्या स्टेटमेंटनंतर अमिताभ बच्चनने आपल्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी कुणाचेही नाव न घेता असे काही लिहिले की, नेटकरी या पोस्टवर त्यांना कॉमेंट्स करत उत्तर देत आहेत. युजर्सचे म्हणणे आहे की, बिग बींनी राहुल गांधींना सडेतोड उत्तर देत त्यांची बोलती बंद केली आहे. (Amitabh Bachchan)
संबंधित बातम्या –

महेश मांजरेकर यांच्या ‘ही अनोखी गाठ’ चित्रपटातील ‘सखी माझे देहभान’ गाणे पाहिले का?  
Bade Miyan Chote Miyan : अक्षय-टायगरच्या बडे मियाँ छोटे मियाँचे टायटल ट्रॅक रिलीज
Amin Sayani : रेडिओ विश्वातील ध्रुव तारा

बिग बींनी आपल्या पोस्टमेध्ये खुलासा केला आहे की, वह सब कुछ एक तरफ रख कर शाम को अपने शारीरिक और ते सर्वकाही बाजूला ठेवून मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करत होते. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं-‘टी ४९२९– वर्कआऊटची वेळ.. शरिराची गतिशीलता…मनाची लवचिकता.. बाकीचे प्रतीक्षा करू शकता…’

ब्लॉगमध्ये काय म्हटलंय? 
याशिवाय, अमिताभ बच्चन यांनी एक ब्लॉग पोस्ट शेअर केला आहे. यामध्ये म्हटलंय की-खूप दिवसांपासून ते एका प्रोफेशनल प्रवासावर होते. दीर्घकाळानंतर कामाचा प्रवास…दीर्घकाळानंतर बेसपासून अनुपस्थिती…दीर्घकाळानंतर रविवारी जीओजे मध्ये नाही…अपूर्ण वाटतं…पण, जीवन सुरुच राहतं…आणि सुरु ठेवण्याची इच्छादेखील कधी कमी होता कामा नये… एक तर पंडित आणि बुद्धीमान सल्ला देत राहतात…आणि वास्तविकता काही वेगळचं नाही…पण, तराही आपण टिकतो आणि प्रयत्न करतो… आणि शुभचिंतकांच्या दबाव आणि समर्थनासोबत ..तुम्हीही सर्व अथक आहात, अनुग्रह आणि ऊर्जाने भरलेले जे आहेत, ते माझ्यासोबत चालतात…मला आशा आणि धाडस देतात. मी यावर खरा राहिन…हीच माझी सदैव प्रार्थना, प्रेम आणि कृतज्ञता असेल.’
अमिताभ यांचे पोस्ट व्हायरल
आपल्या पोस्टमध्ये अमिताभ बच्चनने कुणाचेही नाव घेतले नाही. पण, फॅन्स त्यांच्या या पोस्टवर राहुल गांधींना सडेतोड उत्तर देऊन कॉमेंट करत आहेत. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर अमिताभ यांची आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
Latest Marathi News राहुल गांधींनी ऐश्वर्या रायवर वक्तव्य केल्यानंतर अमिताभ यांची पोस्ट Brought to You By : Bharat Live News Media.