विमानांच्या लेटमार्कला प्रवासी वैतागले अन्…

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबईहून बंगळुरुला निघालेल्या स्पाईस जेटच्या विमानाला दोन तासांपेक्षा जास्त विलंब झाल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. विमानांच्या उड्डाणाला वारंवार लेटमार्क लागत असल्याने अशा एअरलाईन्सवर डीजीसीएने कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत. ( plane latemarks ) संबंधित बातम्या  महिलेच्या पोटातून काढला 5 किलोचा ट्यूमर उद्धव ठाकरे आजपासून विदर्भ, मराठवाडा दौर्‍यावर माजी … The post विमानांच्या लेटमार्कला प्रवासी वैतागले अन्… appeared first on पुढारी.

विमानांच्या लेटमार्कला प्रवासी वैतागले अन्…

मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा : मुंबईहून बंगळुरुला निघालेल्या स्पाईस जेटच्या विमानाला दोन तासांपेक्षा जास्त विलंब झाल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. विमानांच्या उड्डाणाला वारंवार लेटमार्क लागत असल्याने अशा एअरलाईन्सवर डीजीसीएने कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत. ( plane latemarks )
संबंधित बातम्या 

महिलेच्या पोटातून काढला 5 किलोचा ट्यूमर
उद्धव ठाकरे आजपासून विदर्भ, मराठवाडा दौर्‍यावर
माजी सरपंच्याचे बिबट्या पकडण्सायाठी लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बसून उपोषण

मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होत आहे. त्यामुळे विमानतळाच्या हवाई क्षेत्रात वाहतूक कोंडी होत असून विमानांना धावपट्टीवर उतरायला विलंब होतो. परिणामी उड्डाणाला देखील लेटमार्क लागतो. यामुळे भारतीय विमानतळ प्राधिकरणाने मुंबई विमानतळाला नियोजित फ्लाइटची संख्या कमी करण्यासह पीक अवर मध्ये व्यावसायिक जेटच्या हालचाली मर्यादित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार काही एअर लाईन्सनी विमानांच्या संख्येत कपात केली आहे. परंतु तरीदेखील विमानांना उशिर होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
सोमवारी 19 फेब्रुवारी रोजी स्पाईसजेटचे एसजी 268 मुंबई ते बंगळुरू विमानाने दोन तासांपेक्षा जास्त विलंबाने उड्डाण केले. विमानाने रात्री 10.55 वाजता उड्डाण करणे अपेक्षित होते. मात्र मंगळवारी रात्री 1 वाजून 54 मिनिटांनी विमानाचे उड्डाण झाले. या विमानाने ज्येष्ठ नागरिक देखील प्रवास करीत होते. त्यांची प्रचंड गैरसोय झाली. इतर प्रवाशांना देखील मनस्ताप सहन करावा लागला. यामुळे अशा एअरलाईन्सवर डीजीसीएने कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत. ( plane latemarks )
Latest Marathi News विमानांच्या लेटमार्कला प्रवासी वैतागले अन्… Brought to You By : Bharat Live News Media.