‘हवामान’ उपग्रह INSAT-3DS संदर्भात ISROची मोठी अपडेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) INSAT-3DS या ‘हवामान’ उपग्रहाचे १७ फेब्रुवारीला यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते. इस्रोने या हवामान उपग्रहासंदर्भात महत्त्वाची अपेडट दिली आहे. (ISRO INSAT-3DS Mission) आंध्र-प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३५ वाजता INSAT-3DS हा उपग्रह GSLV-F14 रॉकेटच्या सहाय्याने यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला होता. ‘हवामान’यान २८ फेब्रुवारी ऑर्बिट … The post ‘हवामान’ उपग्रह INSAT-3DS संदर्भात ISROची मोठी अपडेट appeared first on पुढारी.
‘हवामान’ उपग्रह INSAT-3DS संदर्भात ISROची मोठी अपडेट

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) INSAT-3DS या ‘हवामान’ उपग्रहाचे १७ फेब्रुवारीला यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते. इस्रोने या हवामान उपग्रहासंदर्भात महत्त्वाची अपेडट दिली आहे. (ISRO INSAT-3DS Mission) आंध्र-प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३५ वाजता INSAT-3DS हा उपग्रह GSLV-F14 रॉकेटच्या सहाय्याने यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला होता.
‘हवामान’यान २८ फेब्रुवारी ऑर्बिट टेस्टिंगमध्ये पोहचणार
इस्रोने एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, “INSAT-3DS या ‘हवामान’ उपग्रहातील सर्व चार नियोजित लिक्विड अपोजी मोटर (LAM) फायरिंग आज (दि.२२) यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. हे ‘हवामान’ यान सध्या जिओसिंक्रोनस ऑर्बिटमध्ये आहे. त्यानंतर ते बुधवार २८ फेब्रुवारी रोजी  ‘ऑर्बिट टेस्टिंगमधील (IOT) स्थानावर पोहोचणे अपेक्षित आहे, असेदेखील इस्रोने म्हटले आहे. (ISRO INSAT-3DS Mission)

🛰️INSAT-3DS update:
All four planned Liquid Apogee Motor (LAM) firings are completed.
The spacecraft is now in the geosynchronous orbit.
It is expected to reach the In Orbit Testing (IOT) location by February 28, 2024. pic.twitter.com/0x84L8iIPn
— ISRO (@isro) February 22, 2024

INSAT-3DS मिशनचे उद्दिष्ट
हवामानविषयक निरीक्षणे, हवामान अंदाज आणि आपत्ती चेतावणीसाठी जमीन आणि महासागराच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करणे. उपग्रह सहाय्यित शोध आणि बचाव सेवा प्रदान करणे. तसेच विद्यमान कार्यरत INSAT-3D आणि INSAT-3DR उपग्रहांद्वारे प्रदान केलेल्या सेवांचे सातत्य सुनिश्चित करणे हे या मिशनचे उद्दिष्ट आहे, असेही इस्रोने म्हटले आहे.
INSAT-3DS: ‘हवामान’ संस्थांसाठी महत्त्वाचा उपग्रह
INSAT-3DS हा हवामानविषयक उपग्रह समुद्राच्या पृष्ठभागाचा तपशीलवार अभ्यास करेल, ज्यामुळे हवामानाची अचूक माहिती मिळेल, तसेच नैसर्गिक आपत्तींबाबत अधिक चांगले अंदाज येण्यास मदत होणार आहे. नैसर्गिक आपत्तींची अचूक माहिती अगोदर मिळाल्यावर त्या रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जातील. त्यामुळे भारतीय हवामान संस्थांसाठी हा हवामान उपग्रह अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
हेही वाचा:

ISRO INSAT-3DS Mission : हवामान उपग्रह INSAT-3DS प्रक्षेपणासाठी ISRO सज्ज; जाणून घ्या ‘या’ मोहिमेविषयी
ISRO INSAT-3DS Mission: इस्रोच्या INSAT-3DS ‘हवामान’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
GSLV-F14/INSAT-3DS Mission | हवामान उपग्रहासाठी ISRO सज्ज; INSAT-3DS चे उद्या प्रक्षेपण

Latest Marathi News ‘हवामान’ उपग्रह INSAT-3DS संदर्भात ISROची मोठी अपडेट Brought to You By : Bharat Live News Media.